Home Breaking News पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे नाशिक शिक्षण विभागावर खडे बोल व सुक्ष्म...

पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे नाशिक शिक्षण विभागावर खडे बोल व सुक्ष्म अभ्यासातून समस्यावर कार्यवाही .

दप्तर दिरंगाई झाल्यास कार्यवाही करू पदवीधर आमदार सत्यजीत तांबे_प्रत्येक फाईलचा निपटारा आठ दिवसाच्या आत झालाच पाहिजे नाही तर दप्तर दिरंगाई कायदया आंतर्गत कारवाईस सामोरे जावे लागेल. शिक्षण विभागाला दिला इशारा .

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

नाशिक जिल्हा परिषदेतील रावसाहेब थोरात सभागृहा मध्ये पदवीधर मतदार संघाचे, विधानपरिषदेचे तरूण, तडफदार व अभ्यासू कार्यक्षम आमदार सत्यजित तांबे यांच्या मुख्य उपस्थितीत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षण विभागाचे आधिकारी यांच्या* *समवेत सभा पार पडली .शिक्षणाधिकारी प्रविण पाटील, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे, गणेश फुलसुंदर, प्रकाश आहिरे ,कार्यालयीन अधिक्षक  सुधिर पगार,पे युनिट अधिक्षक  नितीन पाटील इ. आधिकारी उपस्थित होते. शिक्षण खात्यातील प्रामुख्याने अनेक समस्यावर चर्चेत नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी. देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, सतीष पैठणकर,अनिल नहार, टी डी एफ चे मोहन चकोर, प्रसिद्धी प्रमुख नागरे बी. के तसेच राजेंद्र लोढे,संग्राम करंजकर, निलेश ठाकूर, दिनेश अहिरे इ .चर्चेत सहभागी झाले .
आमदार सत्यजित तांबे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन कायम केले आजपर्यंत झालेल्या कार्यवाहीची शहानिशा केली . प्रत्येक प्रश्नावर व समस्येवर उपाययोजना व कार्यवाहीची मागणी केली.अनुत्तरीत आधिकाऱ्यावर कारवाईची देखील मागणी केली. यावेळी अनेक प्रश्नापैकी प्रामुख्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिनांक २४/3/2023 ला शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षकांच्या सेवाजेष्टता यादी कशी तयार करावी याबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे . तसेच ६१६ शिक्षक कर्मचारी यांची त्रुटीची बीले निकाली काढणे, शिक्षक व शिक्षकेतर यांची फरकबीले, मेडीकल बीले, रजा रोखीकरण, टप्पा बीले त्वरीत निकाली काढणे .टॅब उपलब्ध नसल्यामुळे निधी खर्ची करणे हे निमित्त संयुक्तीक वाटत नाही .विविध हेडची माहिती करून घेतली . निधी खर्चावरून अनेक शंकाचे समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत . समाजकल्याण विभागाच्या तुकडी अनुदानावर देखील लक्ष केंद्रीत केले . शालार्थ आय डी किती प्रस्ताव दाखल व प्रलंबीत आहे याबाबत खुलासा मागविला, साने गुरुजी शिक्षण प्रसारक मध्ये प्रशासकांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच इतर संस्था अंतर्गत अनेक वाद चालू आहे .यांच्या सुनावणी व हरकती वर चर्चा झाली. मान्यता व इतर समस्यांच्या निपटारा त्वरीत करणे.  त्यांच्या वादात कर्मचाऱ्यांचे नुकसान होता कामा नये असे खडे बोल सुनावले. वरिष्ट व निवड वेतन श्रेणी बाबत , संच मान्यता, सरल , DCPS व NPS चा हिशोब देणे . इ बाबत चर्चा झाली .सभेची विशेष बाब म्हणजे संपूर्ण जिल्हा व विभागामध्ये देखील मुख्याध्यापक व लिपीक यांची कार्यशाळा दोन किंवा तीन तालुके मिळून 20 ऑगस्ट पूर्वी घेणे . कोणतीही फाईल तपासून आवक करावी त्रुटी प्रस्ताव असलेल्या फाईल स्विकारू नये. दप्तर दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. आरटीई चे प्रमाणपत्र व वेतनेत्तर अनुदानापासून वंचित राहता कामा नये. इ बाबत ठोस पाऊले उचलण्याचे सुचित केले. तरुण व अभासू असलेले सलग तीन तास मिटींग घेतल्याने आधिकारी, शिक्षक व मुख्याध्यापक यांना समाधान व्यक्त केले.

Previous articleमहाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २६ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध
Next articleपारस ग्रामपंचायत भोंगळ कारभार