Home Breaking News गुडगाभर चिखलात महिलांना अल्प मजुरीवर चालवावा लागतो संसाराचा गाढा !

गुडगाभर चिखलात महिलांना अल्प मजुरीवर चालवावा लागतो संसाराचा गाढा !

👉 महिला शेतकऱ्यांना अजुन मदतीची गरज.

*मारोती अक्कलवाड पा. सवनेकर*
*जिल्हा संपादक नांदेड*

दिनांक – 04 ऑगस्ट 2024 संपुर्ण नांदेड जिल्ह्यात यावर्षी जुन- जुलै महिन्यात दरवर्षी प्रमाणे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. हे सत्य नाकारता येत नाही. विहीर, बोअर, नदी- नाल्यांना म्हणावा तसा पुर अजुन आला नाही. त्यामुळे नदी, नाले अजुन कोरडेच आहेत.
पिकांसाठी दररोज पाऊस पडत असल्याने फायदेशीर आहे. पण….तण पोसण्यासाठी हा पाऊस शेतकऱ्यांना थोडाचा खर्चिक आहे. असे जाणकार शेतकरी सांगत आहेत.
अश्याच एका शेतावर शिवारफेरी करत असतांना काही महिला नगदी पीक म्हणून समजले जाणा-या हळद या पिकात चिखलात महिलांना हळदीचे निंदण ( पिकांतील तण काढणे) करतांना आकाशातुन रिमझिम पाऊस चालू असतांना निदंण करत होत्या. हे चित्र पाहून कृषि प्रधान भारत देशातील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत असतांनाचे वास्तव चित्र पाहायला मिळाले.
या कृषिप्रधान देशात विशेषतः दहावी, बारावी, पदविका, पदविधर महिलांना महाराष्ट्र सरकारने उद्योगांसाठी आत्मनिर्भर करण्यासाठी भरीव निधी विधानसभा निवडणुकीच्या आदी देण्यात यावा. अशी शेतातील निदंण काढत असलेल्या महिलांनी केली आहे.

 

Previous articleकृषी विभाग हिमायतनगर यांच्या वतिने मोजै कोठा येथे शेतीशाळा संपन्न*
Next articleकारला पि. गावच्या पोलीस पाटील पदी साईनाथ कोथळकर