मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 04 ऑगस्ट 2024
तालुक्यातील मोजै कोठा येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना सोयाबीन पिकाची शेतीशाळा कृषी विभागाकडून घेण्यात आली. सदर शेतीशाळेत शेतकरी सोयाबीन पिकावरील खोड माशी, चक्र भुंगा सोयाबीन पिकांवर फार मोठ्या स्वरूपात येणारा येलो मोझाॅक व्हायरस यांचे नियोजन येण्यापूर्वी काय काळजी घ्यावी. लक्षणे कोणती आणि उपाय योजना काय करावी. पिकांचे अन्नद्रव्ये व्यवस्थापण टप्पा नुसार माहिती आर्थीक नुकसान पातळी नुसार एकात्मिक नियंत्रण, रासायनिक उपाय योजना सापळ्याचा वापर कसा करावा, या बाबत मार्गदर्शन करून सापळ्याचे वाटप करण्यात आले. व पक्षी थाऺबे,पिवळे चिकट सापळे या बाबत माहीती देण्यात आली तसेच कापसावरील रस शोषन करणारे किडीची माहीती देऊन व्यवस्थापणा बाबत माहीती देण्यात आली. शेतक-यानी कापुस पिकाची निरीक्षणे घेऊन, चित्रीकरण व सादरीकरण केले. साऺघीक खेळ घेउन शेतीशाळा वर्ग 3 सदर करण्यात आली. शेतीशाळेत प्रशिक्षण प्रवर्तक तथा कृषी साहायक कोटूलवार साहेब, मार्गदर्शक कल्याण वानखेडे उपस्थित होते आणि यांनी पिक व्यवस्थापन व नियोजन या विषयावर अतिशय चांगले शेतकऱ्यांना शेतीशाळे द्वारे आज माहिती देण्यात आली.
*शेतीशाळेचे फायदे खाली प्रमाणे दिसून आले आहे.
*शेतिशाळेचे फायदे-*
1. शेतिशाळेत सहभाग घेणारे शेतकरी यांचे मध्ये स्वत:चा आत्मविश्वास निर्माण होतो. स्वत:ला निर्माण झालेल्या अडचणी,शंका तो मांडू शकतो व चर्चा कर शकतो. एकात्मिक पिक व्यवस्थापन करताना कोणती पद्धती योग्य की अयोग्य या बाबतीत तो संभ्रमावास्थेत न राहता आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो.शेतकरी बोलका झाला..
2. शेतिशाळेत स्वत: प्रात्यक्षिक स्वरुपात प्रत्येक गोष्ट केल्यामुळे योग्य काय किंवा अयोग्य काय या बाबतीत आपल्या शेतीतील निर्णय घेण्यास शेतकरी निर्णयक्षम बनतात. उदा. बियाणे,मशागत पद्धती, कोणत्या घ्याव्यात याबाबत निर्णय ते स्वत: घेऊ शकतात.
3. शेतकरी शत्रु किड व मित्र कीटक ओळखू शकतात. सर्वसाधारणपणे शेतकरी हा शेतात कोणत्याही प्रकारचा कीटक दिसला की तो पिकाचा शत्रु समजून फवारणी घेणे हा पर्याय निवडतो. परंतू शेतिशाळेचे प्रशिक्षण घेतलेला शेतकरी हा आपल्या शेतात असणारे शत्रु किडी व मित्र किटक ओळखू शकतो. त्यामुळे तो त्या शेतातील व्यवस्थापनाचे निर्णय स्वत: घेऊ शकतो.
4. शेतिशाळेचे शेतकरी हे पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे या बाबतीत दक्ष राहतात. पर्यायाने उत्पादन खर्च कमी होवुन शेतकरी यांचा फायदा कशा होईल हे सर्व शेतकऱ्यांना कळले आहे
5. छोट्या छोट्या गटात काम केल्याने सहकार्याची भावना वृद्धींगत होते.या मुळे त्यांना पिका बदल माहिती मिळाली
6.पिक निहाय तंत्रज्ञान आणि त्या संबंधीत कौशल्ये शेतकरी यांचे पर्यंत प्रभावी पणे पोचतात आले आहे…