Home Breaking News वाडेगाव अशोक नगर मध्ये घाणीचे साम्राज्य

वाडेगाव अशोक नगर मध्ये घाणीचे साम्राज्य

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो 8888872854
बाळापूर:- वाडेगाव येथील अशोक नगर मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले असून येथील जनतेच्या आरोग्याचा प्रशन निर्माण झाला आहे विशेष म्हणजे ही मागासवगीय वस्ती आहे या वस्तीत स्थानिक ग्राम प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करीत असते . येथील नाल्या तुडुंब भरल्या असून नाल्यांची साफ सफाई होत नाही.याच परिसरात एक पाण्याची टाकी आहे त्या टाकीला एकूण आठ नळ आहेत त्यातील सहा नळ सूरू आहेत.
सदर टाकीच्या बाजूला नाली असून त्या नाली मधली घाण टाकीच्या आजू बाजूला पसरली आहे त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे
सार्वजनिक नळावर पण हीच परिस्थिती आहे पावसाळ्याच्या दिवसात एखादी रोगराई पसरली तर जबाबदारी प्रशासन घेईल का
असा प्रशन उपस्थित होते आहे

Previous articleमाजी सभापती डॉ. प्रकाश वानखेडे यांची काॅग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.
Next articleकृषी विभाग हिमायतनगर यांच्या वतिने मोजै कोठा येथे शेतीशाळा संपन्न*