Home Breaking News माजी सभापती डॉ. प्रकाश वानखेडे यांची काॅग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

माजी सभापती डॉ. प्रकाश वानखेडे यांची काॅग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 02 ऑगस्ट 2024

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर नगरीचे माजी सरपंच, चेअरमन, हिमायतनगर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक डॉ. प्रकाश वानखेडेमामा यांची काॅग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र जिल्हा अध्यक्ष बि. आर. कदम यांनी एक ऑगस्ट रोजी विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते वितरीत केले आहे.
डॉ. प्रकाश वानखेडे हे स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिक कार्यकर्ते असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिचीत आहे. उच्चशिक्षित असुन साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले डॉ. वानखेडे मामा हे जनसामान्यांच्या हिताची कामे करण्यासाठी सदैव तत्पर असतात. पक्षाशी एकनिष्ठ राहुन काम केल्याने त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड हि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी पावती म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वानखेडे मामा यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.🌹

Previous articleसततधार,अति पावसामुळे देगाव येथे घर कोसळले !
Next articleवाडेगाव अशोक नगर मध्ये घाणीचे साम्राज्य