Home Breaking News सततधार,अति पावसामुळे देगाव येथे घर कोसळले !

सततधार,अति पावसामुळे देगाव येथे घर कोसळले !

अकोला जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो 8888872854
वाडेगाव -येथून जवळच असलेल्या ग्राम देगांव येथे अति पावसामुळे घर कोसळून एका गरीब कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला असून शासकीय मदतीला कोणी धावून येईल का ? अशी अपेक्षा हे गरीब कुटुंब करत आहे. सविस्तर वृत्त असे की, देगांव येथे राहत असलेले याकूब खा हे अत्यंत गरीब असून शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. सततधार पाऊस गेल्या पाच सहा दिवसापासून सुरु आहे. शेतीचे कामे ठप्प पडले असून हाताला काम नसल्याने संपूर्ण परिवार घरीच होता. काल रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक घराच्या भिंती कोसळल्या सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. देगांव ग्रामपंचायत चे ग्रामसेवक रवि इंगळे हे या घराला भेट देऊन गेले. तरी महसूल विभाग यांनी पंचनामा करून आपत्ती व्यवस्थापन विभाग कडून या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी होत आहे.

Previous articleओबीसींनो हित अहित जाणा…!!
Next articleमाजी सभापती डॉ. प्रकाश वानखेडे यांची काॅग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी निवड.