Home Breaking News ओबीसींनो हित अहित जाणा…!!

ओबीसींनो हित अहित जाणा…!!

* ओबीसींनो हित अहित जाणा…!!
———————————-
तुम्ही शुद्र होतात. मग ओबीसी कसे झालात…??
इतिहास असे सांगतो की,छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ते शुद्र असल्याने ब्राम्हणांनी नाकारला होता. तुकाराम महाराज शुद्र असल्याने त्यांना ज्ञान देण्याचा अधिकार नव्हता म्हणून त्यांच्या गाथा धर्म पंडीतांनी इंद्रायणीत बुडविल्या होत्या…!!
ही दोन ठळक उदाहरणे हेच सांगतात की, वर्ण व्यवस्थेत शुद्र हा अतिशय हीन पातळीवर होता….!!
त्याला राजा होता येतं नव्हते तसेच त्याला धार्मिक पंडित म्हणून मान्यता सुद्धा मिळतं नव्हती…!!
राजा होण्याची पात्रता अंगी असलेल्या शिवाजी भोसले यांचा राज्यभिषेक नाकारणे. आणि जगदगुरु होण्याची बौद्धिक पात्रता अंगी बाळगणाऱ्या तुकाराम महाराज यांच्या गाथा नदीत बुडविणे या घटना शुद्राला कशी वागणूक मिळत होती त्याचा बोलका पुरावा आहे. मग सर्वसामान्य लोहार, कुंभार, धनगर, मातंग, शिंपी, बेलदार अशाप्रकारच्या सात हजारांहून अधिक जातीच्या शुद्रांचे काय हाल असतील…??
मुठभर ब्राम्हण्यवादी ५२% संख्या असलेल्या ओबीसी समुहावर धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय सत्ता गाजवित होता, हेच इतिहास दाखवून देतोय…!!
शुद्राला शुद्र न ठेवता. हीन पातळीवर न ठेवता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात प्रथम संविधानामध्ये ओबीसी हा सन्मानजनक शब्द वापरला. आणि शुद्राला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी बनविले…!!
शुद्राला हीन पातळीवरुन उचलून सन्मानजनक पातळीवर नेऊन बसविण्याचे महत्तम कार्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले हे आजच्या ओबीसी समुहाने लक्षात घेतले पाहिजे. आपला ऊद्धारकर्ता जाणला पाहिजे…!!
वर्ण व्यवस्था संपली जातीव्यवस्था आली आणि शुद्राला अनेक तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचे दृष्ट षडयंत्र मनुवाद्यांनी अमलात आणले ओबीसी समुहाचे सात हजारांहून अधिक जातीत विभाजन करुन तुकडे केल्या गेले….!!
अतिशय छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभाजित समुह एकत्र येऊन मनुवादा विरुद्ध लढणे. प्रगती करणे किंवा एकत्र येऊन सत्ताधारी होणे शक्य नाही म्हणून मुठभर मनुवादी ओबीसी समुहाला पुर्वीच्या शुद्रा प्रमाणेच वापरुन घेण्याचा प्रयत्न आजही करीत असतात….!!
हजारो वर्षापासून कायम सत्तेत राहण्याची मानसिकता बाळगून असलेला मुठभर सत्ताधारी वर्ग ओबीसी समुहाला सत्तेचा वाटेकरी होऊ देतं नाही. सत्ताधारी होऊ देतं नाही…!!
परंतु ओबीसी समुहाचा वापर मात्र खुबीने करुन घेतोय…!!
सांसदीय लोकशाही मध्ये बहुमताने सत्ता मिळतेय ओबीसी ५२% आहे मात्र तो सत्ताधारी नाही हे वास्तव ओबीसी समुहाने समजून घेतले पाहिजे…!!
सांसदीय लोकशाही ला ७३ वर्षे ऊलटली मात्र ओबीसींच्या हक्कासाठी जातिनिहाय जनगणना झाली नाही. सरकार कॉंग्रेस पक्षाचे असो की,हिंदुत्ववादी भाजपचे असो. इंग्रजांनी जातिनिहाय जनगणना केली होती. त्या आकडेवारीनुसार ओबीसी हक्क आणि अधिकाराचे गणित मांडले जाते.देशी राज्यकर्ते किती बदमाश आहेत हे ओबीसी समुहाने समजून घेण्याची वेळ आली आहे….!!
जातिनिहाय जनगणना केली जातं नाही मात्र हिंदू मुस्लिम धार्मिक दंग्यासाठी ओबीसी तरुणांचा वापर केला जातो हे दुष्टचक्र ओबीसी समुहाने समजून घेतले पाहिजे….!!
हनुमान चालीसा भोंग्यातून म्हणण्यासाठी ओबीसी तरुणांना भोंगे पुरविले जातात मात्र ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जातं नाही हे ओबीसी समुहाने समजून घेतले पाहिजे….!!
विशालगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी ओबीसी तरुणांचा वापर केला जातो मात्र ओबीसींच्या मुलांच्या शिक्षणासाठी निधी उपलब्ध केला जातं नाही…!!
ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी एकही सत्ताधारी राजकीय पक्ष भुमिका घेतं नाही. मात्र ओबीसीं मराठा वाद पेटवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचं नियोजन मात्र संधीसाधू घराणेशाही वाले करीत आहेत.२२५ आमदार निवडून आणण्याची भाषा समजून घेतली पाहिजे….!!
एका बाजूला मंडल आयोग लागू करणारा प्रकाश आंबेडकर यांच्या सारखा कर्तबगार नेता आहे. तर दुसऱ्या बाजूला मंडल आयोग संपवण्याची तयारी करणारे राजकीय पक्ष व सरंजामी नेते आहेत. हीत अहित कशात आहे हे ओबीसी समुहाने समजून घेतले पाहिजे…!!
एका बाजूला तुमच्या मुलांना धार्मिक,जातीय दंगली मध्ये झोकण्यासाठी टपून बसलेले सत्ताधारी राजकीय पक्ष आहेत. तर दुसऱ्या बाजूला तुमचे ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी आरक्षण बचाव यात्रा काढून शांतता कायम रहावी म्हणून झटणारा नेता बाळासाहेब आंबेडकर आणि राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. हीत अहित कशात आहे ते समजून घ्या….!!
एका बाजूला पुर्वीच्या शुद्राप्रमाणे ओबीसी समुहाला वापरून घेणारा घराणेशाही जोपासणारा वर्ग आहे तर दुसऱ्या बाजूला १०० आमदार निवडून देण्याची हमी देणारा समतावादी समाज,आणि नेता आहे. सत्ताधारी व्हायचे की, घराणेशाही वाल्यांचे जोडे उचलायचे.?
हीत अहित कशात आहे हे ओबीसी समुहाने ठरविण्याची वेळ आली आहे…!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.

Previous articleवाडेगाव येथील ग्रामपंचायत कारभारामधे ; सरपंच “पती” यांची ढवळाढवळ !
Next articleसततधार,अति पावसामुळे देगाव येथे घर कोसळले !