Home Breaking News वाडेगाव येथील ग्रामपंचायत कारभारामधे ; सरपंच “पती” यांची ढवळाढवळ !

वाडेगाव येथील ग्रामपंचायत कारभारामधे ; सरपंच “पती” यांची ढवळाढवळ !

अखेर वाडेगाव नागरिक यांचे सह्या असलेल्या तक्रारीमधे,आशय सरपंच पती यांच्यावर दंडात्मक कार्यवाही व्हावी 

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो ,8888872854

बाळापुर तालुका वाडेगाव येथील ग्रामपंचायत कारभारमध्ये सरपंच पती ढवळाढवळ करीत असल्याबाबत तक्रार सादर करण्यात आली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना गटविकास अधिकारी पंचायत समिती बाळापुर यांच्यामार्फत
सादर करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये वाडेगांव येथील ग्रामपंचायत च्या सरपंच रूपाली अंकुश शहाणे यांचे पती अंकुश दत्ता शहाणे ग्रामपंचायत च्या कारभारामध्ये ढवळाढवळ करतात आहे तसेच विकास करण्यासाठी आलेल्या निधी परस्पर खर्च करण्यास सांगतात
तसेच वार्ड क्रमांक एक मध्ये खोदून ठेवलेले रस्ते व खड्डे
चिखलमय झालेल्या प मुख्य महामार्गाची दुरुस्ती करणे साठी तक्रार देऊन गेले असता तुमच्या रस्त्याची दुरुस्ती होऊ देणार नाही असे उद्धट भाषा बोलतात महोदय ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या तरतुदींचा भंग ठरतो
परिणामी आपण तक्रारीचे गांभीर्य
लक्षात घेता अंकुश दत्ता शहाणे सरपंच पती यांच्याविरुद्ध दंडीत कारवाई करावी असे सादर करण्यात आले आहे तसेच सादर करण्यात आलेल्या तक्रारीवर
मुद्दे १)वाडेगाव गजानन वाडी वॉर्ड नंबर 1 मध्ये रस्त्याचे काम गेल्या कित्तेक वर्षापासून होत नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात शाळेतील विदयार्थ्यांना तसेच वयस्कर रुग्णाला यां चिखलमय रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो परिणामी रुग्णांना अशा प्रकारे खांद्यावर उचलून न्यावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन रस्ता निर्माण करावा जे-णे करून विद्यार्थ्यासह रुग्णांना त्रास होणार नाही.
विलास मानकर योगेश कंडारकर . नितेश जाधव. प्रतीक इंगळे अजय. कोलोरे. किशोर बुंदे गजानन बावणे. संजय सरदार. सागर नकासकर. राहणार वार्ड क्रमांक एक या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच प्रशांत धाडसे यांनी सुद्धा याच आशयाची
तक्रार दाखल केली असल्याची माहिती आहे

Previous articleसवना ज. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची प्रगतीकडे वाटचाल!
Next articleओबीसींनो हित अहित जाणा…!!