मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक-23 जुलै 2024
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. हे निजामकालीन चळवळीत गांव म्हणुन तशी संबंध मराठवाड्यात नव्हे महाराष्ट्र ओळख आहे. कारण येथील कै. स्वातंत्र्य सैनिक गणपतराव पिटलेवाड , तत्कालीन उच्चशिक्षित कै. संभाजी पाटील, पोस्टमास्तर कै. परशराम अनगुलवार , कै.माजी सरपंच बाबाराव भुसाळे कै. माजी सरपंच लक्ष्मण अनगुलवार या दिग्गज मंडळीनी सवना ज. भुमीचे नांव यथोच्च प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले.
त्यांच्याच कार्याचा वसा म्हणून मा. चेअरमन सुभाष गायकवाड यांनी काहीकाळ आपले कार्य केले आहे. तसेच मा. सभापती तथा विद्यमान सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सुर्यकांता पाटील, मा. खासदार अॅड शिवाजी माने, माजी खासदार सुभाषराव वानखेडे व विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सहकार्याने गावचा होतांनाचे चित्र नाकारता येत नाही.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत प्रत्यक्ष कृतीतुन विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी, आवड निर्माण झाली पाहिजे. याच उद्देशाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना ज. च्या मुख्याध्यापिका सौ. मजुषा बोडावार मॅडम व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक बांधव आपल्या दैनंदिन अध्यापनात स्वतःला झोकून देत आहेत. हि बाब विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आनंद देणारी आहे. विविध उपक्रमातील शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची निर्माण व्हावी हाच काहिसा प्रयत्न आहे. तो अभिनंदन आहे.