चार वर्षापासून काम सुरू असलेल्या पळसपुर -डोलारी या अंतर्गत रस्त्याची चौकशी करून गुत्तेदाराला काळ्या यादीत टाका – नागोराव शिंदे पळसपुरकर
अंगद सुरोशे
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर – तालुक्यातून जाणारा पळसपूर डोल्हारी सिरपल्ली मार्गे जाणारा महामार्ग हा अनेक कारणामुळे वादाच्या भौऱ्यात अडकलेला पाहावयास मिळत आहे. गुत्तेदार चार वर्षापासून या कामास सुरुवात करुन काम पूर्ण करण्याचे टाळत असून कामही अगदी निकृष्ट दर्जाचे होत आहे. यामुळे पळसपुर येथील सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे व स्वामी लोहराळकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा अधिकारी नांदेड यांच्या कडे रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदाराला काळ्या यादी टाका अशी मागणी केली आहे.अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर ते पळसपुर डोल्हारी सिरपल्ली या अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला परंतु चार वर्षाचा कार्यकाळ संपला तरीही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. गुत्तीदारांने या कामाचे बारा वाजले आहेत.कामाचा अवधी संपुष्टात येऊनही हे काम पूर्णत्वास आले नाही.गुत्तेदाराने या विभागाचे कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता व तसेच तत्कालीन उपकार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता यांना मॅनेज करून सुधारक मूल्यांकन करून निधी हडप केला.असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मात्र कामाची अवस्था जैसे थे असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होत असल्याने गुत्तेदाराने या रस्त्याचे काम हिमायतनगर होऊन सुरुवात केले आणि ते बंद सुद्धा केले आहे. पहिल्या उखडलेल्या रस्त्यावर सोलिंग टाकून त्यावर मुरूमाच्या नावाखाली माती टाकण्याचे काम सुरू असून पाऊस पडल्यानंतर या अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून दोषी गुत्तेदार सिद्दीकी (औरंगाबाद )यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि वरील कामाची उच्चस्तरीय चौकशी न झाल्यास या प्रकरणी लोकशाही मार्गाने उपोषण येत्या २९ जुलै रोजी आपल्या कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.याची सरस्वि आपण नोंद घ्यावी अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नागोराव शिंदे पळसपुरकर आणि स्वामी लोहराळकर यांनी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.