Home Breaking News वाडेगाव येथील गजानन वाडी नागरिकांनी नागरी सुविधा मिळणे साठी पंचायत समिती सदस्य...

वाडेगाव येथील गजानन वाडी नागरिकांनी नागरी सुविधा मिळणे साठी पंचायत समिती सदस्य यांना निवेदन केले सादर

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट

बाळापुर तालुका येथील वाडेगाव वार्ड क्रमांक १ मधील गजानन वाडी मध्ये नागरिकांना सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी गजानन वाडी मधील रहिवाशी संतप्त नागरिक अखेर ग्रामविकास अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली आहे. ग्रामपंचायत चे सर्व कर नियमित भरणा करीत असतांना गजानन वाडी हे वस्ती 40 ते 50 वर्षापासून वाडेगाव एक भाग म्हणून विकसीत झाला असुन तरीसुध्दा ग्रामपंचायत प्रशासन कडून विकासाचे कामे होत नाहीत. वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय दुर्लक्ष करत आहे गजानन वाडी मध्ये आतापर्यंत कोणतेही प्रकारचे कॉक्रीट रस्ते व कांक्रीट नाल्या बनविण्यात आलेल्या नाहीत १५ व्या वित्त आरोग्य मधून मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत ला निधी उपलब्ध झालेला आहे. तसेच आमदार खासदार व जिल्हा परिषद फंडातुन विकास कामे व्हायला पाहिजे होते. ग्रामपंचायत परिक्षेत्रात विकास कामापासून वंचित ठेवण्याचे कामे केले.
गजानन वाडी मध्ये सर्व जाती-धर्माचे लोक राहत असून तेथे शेतकरी शेतमजूर लोकांना जिल्हा परिषद फंडाच्या माध्यमातून गजानन वाडी येथे काॅक्रीट रस्ते काॅक्रीट नाल्या व कचरा कुंडी करून द्यावेत तसेच या परिसरात मध्ये कचरा गाडी सुरू करण्यात यावी गावात सर्व ठिकाणी कचरा घंटागाडी फिरत आहे परंतु गजानन वाडी मध्ये सादर गाडी कधीच येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये आक्रोश वाढत आहे. तरी प्रशासन ने आम्हाला नागरी सुविधा द्याव्या.

Previous articleअनिल लक्ष्मणराव माने करंजीकर यांना पी. एच.डी . प्रधान…..
Next articleपळसपुर – डोल्हारी अंतर्गत येणारा रस्ताच्या कामाला गुत्तेदाराचा मनमानी कारभार….