वाडेगांव येथील सरपंच व ग्रामसेवकांचे गजानन वाडी यांच्याकडे दुर्लक्ष
प्रतिनीधी -बाळापूर तालुक्यातील वाडेगांव असलेलं गावातील गजानन वाडी रस्ता असलेल्या परिसराकडे गावात जाणारा रस्ता हा पहिल्याच पावसाच्या पाण्यात तुडुंब भरल्याने येथे घाण पसरून नागरिकांचे स्वास्थ धोक्यात आले आहे.चिखल आणि घाणीच्या सम्राज्याचा गावातील महिलांना व गावातील गजानन वाडी नागरीकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
सविस्तर वृत्त असे की गजानन वाडी राहत असलेले नागरिक पहिल्याच पावसात रस्त्याने पाणीच पाणी साचले असुन तसेच तिथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्ते पाण्यात असल्याने पाण्यात गजानन वाडी की पाणी असा नागरीकांना प्रश्न पडत आहे.सत्ताधारी या बाबीला बगल देत गावातील मतदारांनी नव तरुनांना भरपुर मोठ्या प्रमाणात मतदान देत युवा तरुनांना संधी दिली. एक हाती सत्ता देत नऊ उमेदवार निवडून दिले. मतदाना च्या आगोदर आश्वासनांचा बाजार मांडणारे त्या आश्वासनांची पुर्तता मात्र वाडेगांव गजानन वाडी गावात झालेली कुठेही दिसुन येत नाही.
याच बरोबर नालेसफाई चे काम झाले नसल्याने नाले तुडुंब भरून त्यातील पाणी रस्त्यावर साचून राहत आहे.गावातील नवीन झालेले रस्ते जल जीवन योजनेच्या कामासाठी मधून फोडण्यात आले. यामुळे सगळीकडे चिखलच चिखल झाला आहे. दुचाकीचालकांना तर आपला जीव मुठीत धरून वाहने न्यावी लागत आहेत. गजानन वाडी पसरलेले घाणीचे साम्राज्य यामुळे गावकरी वैतागले आहेत.या गजानन वाडी कडे सरपंच तसेच ग्रामसेवकांचे यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचे पहायला मिळत आहे. सदर बाबीकडे लक्ष न दिल्यास नागरिक आंदोलन करतील असेपण बोलल्या जात आहे.