Home Breaking News कार्ला -पिचोंडी गाव घाणीच्या विळख्यात

कार्ला -पिचोंडी गाव घाणीच्या विळख्यात

कार्ला येथील सरपंच ग्रामसेवकांचे गावाकडे दुर्लक्ष

अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनीधी – तालुक्यातील मौजे कारला गावातील मुख्य रस्ता असलेल्या मंदिर व बौध्द विहार परिसराकडे गावात जाणारा रस्ता हा पहिल्याच पावसाच्या पाण्यात तुडुंब भरल्याने तसेच चिखलाचा आणि घाणीच्या सम्राज्याचा गावातील महिलांना व गावातील नागरीकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
सविस्तर वृत्त असे की गावातील रहदारीचा मुख्य रस्ता पहिल्याच पावसात रस्त्याने पाणीच पाणी झाले तसेच तिथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्ते पाण्यात असल्याने पाण्यात गाव की गावात पाणी असा नागरीकांना प्रश्न पडत आहे.सत्ताधारी या बाबीला बगल देत गावातील मतदारांनी नव तरुनांना भरपुर मोठ्या प्रमाणात मतदान देत युवा तरुनांना संधी दिली. एक हाती सत्ता देत नऊ उमेदवार निवडून दिले. मतदाना च्या आगोदर आश्वासनांचा बाजार मांडणारे त्या आश्वासनांची पुर्तता मात्र कार्ला पिचोंडी गावात झालेली कुठेही दिसुन येत नाही.
याच बरोबर नालेसफाई चे काम झाले नसल्याने नाले तुडुंब भरून त्यातील पाणी रस्त्यावर साचून राहत आहे.गावातील नवीन झालेले रस्ते जल जीवन योजनेच्या कामासाठी मधून फोडण्यात आले. यामुळे सगळीकडे चिखलच चिखल झाला आहे. दुचाकीचालकांना तर आपला जीव मुठीत धरून वाहने न्यावी लागत आहेत.गावात पसरलेले घाणीचे साम्राज्य यामुळे गावकरी वैतागले आहेत.या बाबीकडे सरपंच तसेच ग्रामसेवकांचेही दुर्लक्ष होत असल्याचे पहायला मिळत आहे.तसेच ग्रामपंचायत कार्यालय कामे , पाणी फिल्टर, शाळेचे शुशोभीकरण, मंदिर परिसरात शुशोभीकरण अश्या अनेक कामाचे पत्रक मात्र धूळखात कागदोपत्रीच आहेत अशी चर्चा नागरीकांमध्ये होताना दिसत आहे.

Previous articleविडुळ येथील ३५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…
Next articleवाडेगाव येथील स्थानिक गजानन वाडी नागरिकांचे स्वास्थ धोक्यात