👉 आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज!
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 21 जुलै 2024
पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरी भागांसह ग्रामीण भागात मुलं, मुली महिला -पुरुष आजारी पडत आहेत. सर्दी, ताप, खोकला आणि टायफाईडने नागरीक त्रस्त असल्याचे सध्या चित्र दिसत आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर, सिस्टर, नर्स यांची कमालीची अनुपस्थितीत राहत असल्याने जनता विविध आजाराने बेजार झाले आहेत. मधुमेह, बिपी, गरोदर माता यांची दैनंदिन तपासणी करण्यासाठी ग्रामीण भागातील डॉक्टर,सिस्टर यांनी मुख्यालयी राहावे अशी मागणी होत आहे. परंतु तसे दिसत नाही.
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी शिबिर घ्यायला पाहिजे होते. आजपर्यंत कुठलेही आरोग्य शिबीर आयोजित केलेले नाही. लवकरात लवकर आरोग्य शिबिर आयोजित करावे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
👉 लोकप्रतिनिधी आरोग्य विभागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
गलेलठ्ठ पगार घेऊन नागरीकांच्या मागणीला केराची टोपली दाखविली जाते आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी आरोग्य विभासहित अन्य शासकीय यंत्रणेवर आपला वाॅच ठेवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.