Home Breaking News नासिक जिल्हा धनगर समाजाच शिष्टमंडळ यांच पशुसंवर्धन अधिकारी संजयजी शिंदे साहेब...

नासिक जिल्हा धनगर समाजाच शिष्टमंडळ यांच पशुसंवर्धन अधिकारी संजयजी शिंदे साहेब यांना निवेदन सादर

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

*तात्काळ शेळीमेंढी साठी लसीकरणाचे आदेश दिले जातील पशुसंवर्धन अधिकारी यांची ग्वाही*
*पशुसंवर्धन विभागाकडून यापुढील प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध योजनेची माहितीच परिपत्रक काढण्यात येईल पशुसंवर्धन अधिकारी श्री संजयजी शिंदे साहेब यांची ग्वाही*

आज नासिक जिल्हा धनगर समाजाचे शिष्टमंडळ मेंढपाळाच्या विविध समस्या व मेंढपाळाना व धनगर समाजाला पशुसंवर्धन विभागाच्या योजनेबाबत धनगर समाज नासिक जिल्हा वतीने
जिल्हा पशुसंवर्धन विभागात निवेदन देवुन सविस्तर बैठक झाली शेळी मेंढी चे लसीकरण जानावरावर विविध आजारावर उपचार व धनगर समाजासाठी पशुसंवर्धन विभाकडुन शेळी मेंढी गट वाटप व शेळी मेंढी विकास महामंडळ कडुन येणारी योजना तसेच शेळी मेंढी मुत पावल्यास पंचनामा नुकसान भरपाई व इतर विविध योजना बाबत आढावा घेण्यात आला यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री शिंदे साहेब यांनी नासिक जिल्हात प्रत्येक तालुक्यात लसीकरणाचे तात्काळ आदेश दिले जातील व या विभागाच्या योजनेची माहिती प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये परीपत्रक पाठवुन ग्रामसभेत वाचन होईल असे ही शिंदे साहेब यांनी यावेळी सांगितले यावेळी श्री आर पी कुवर साहेब श्री खंडेराव पाटील साहेब श्री अरुण दादा शिरोळे श्री बापुसाहेब शिंदे श्री निंबाभाउ जाधव श्री रत्तन हिरे सौ सोनाली ताई पोटे श्री पिंटुभाउ गाढे श्री अरुण शिंदे श्री हेमंत शिंदे पत्रकार आदि यावेळी उपस्थित होते

Previous articleअकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती
Next articleविधानपरिषदेने धडा दिला…!!