Home Breaking News एक महिना पावसाळा संपला. तरी नदी, ओढयांना पाणीच नाही.

एक महिना पावसाळा संपला. तरी नदी, ओढयांना पाणीच नाही.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 10 जुलै 2024

यावर्षी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाहिजे तसा पाऊस पडत नाही. फक्त पिके जगण्यासाठी पाऊस चांगला पडत आहे. असे जाणकार शेतकरी सांगतात. जुन महिना गेला तरी तरी एकही मोठा पाऊस झाला नाही. नदी, नाले, ओढे, विहीर, बोर यांना नविन पाणी आले नसल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. चारा नाही. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. उन्हाचा पारा वाढत असल्याने लहान लहान पिके दुपारी माना खाली टाकत आहेत. चातक पक्ष्याप्रमाणे पावसाची शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
हवामानाचा अंदाज खोटा ठरत असुन दिवसेंदिवस शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Previous article*भंते शाक्यपुत्र राहुल यांच्या दाना मधून १०० गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप*
Next articleअकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती