Home Breaking News *भंते शाक्यपुत्र राहुल यांच्या दाना मधून १०० गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप*

*भंते शाक्यपुत्र राहुल यांच्या दाना मधून १०० गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप*

दिनांक ८/७/२०२४ रोजी ,करुणा बुद्ध विहार वाडेगाव जिल्हा अकोला या ठिकाणी आर्यन्स बहुउद्देशिय संस्था आयोजित करण्यात आला होता…..

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात*
” *आपल्या दरिद्री व अज्ञानी बांधवांची सेवा करणे हे सुशिक्षितांचे पहिले कर्तव्य आहे. बड्या हुद्द्याच्या जागी गेल्यावर या सुशिक्षितांना आपल्याच अशिक्षित बांधवांचा विसर पडतो.याचे कारण, त्यांच्यात स्वतःच्या समाजाविषयी आपुलकीची भावना राहात नाही,त्यांच्या आपल्या बांधवाविषयी कळकळ व तळमळ नसते हे होय.धर्मभावनेचा अभाव हे ही एक कारण होय.जर त्यांनी आपल्या या असंख्य बांधवांकडे योग्य लक्ष दिले नाही तर समाजाचा ऱ्हास होईल हा उद्देश घेऊन संविधांनिक ,सामाजिक आणि शैक्षणिक, धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी योग्य अयोग्य काय जे माणसाला लायक बनवत नाही, समता आणि नैतिकता शिकवत नाही, ते खरे शिक्षण नाही. खरे शिक्षण हे समाजातील मानवतेचे रक्षण करते, सम्यक उपजीविकेचा आधार बनते, माणसाला ज्ञानाचा आणि समतेचा धडा शिकवते. खरे शिक्षण समाजात आदर्श जीवन निर्माण करते.म्हणून शिक्षण आणि संस्कार बद्दल विध्दार्थी वर्गात उत्साह निर्माण करण्यासाठी
धम्म संस्कार केंद्र आणि शाळा शिक्षण बद्दल त्यांना गोडी लागावी म्हणून सामाजिक जाणीव असलेल्या उपासक वर्गाच्या दाना मधूनच धम्म आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जातात त्यात सतत बाल धम्मसंस्कार ,श्रामनेर शिबिरआयोजित करून तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे गरजु 10,ते 15 मुलांना सतत मदत करून शैक्षणिक उपक्रम राबविणारे
*पूज्य भंते शाक्यपुत्र राहुल*
यांच्या दाना मधून १०० गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गिफ्ट स्कूल बैग नोटबुक पेन …..गिफ्ट देण्यात आले
सर्वच कारेक्रम चे आयोजन आर्यन्स बहु उद्देशिय संस्था आणि करुणा बुद्ध विहार बॅनर खाली आयोजित केला होता
ह्या साठी प्रमुख उपस्थिती
आयु. माननीय खुरेंद्र तिडके समाज कल्याण अधीक्षक नितीन सपकाळ रुग्ण सेवा समिती अकोला सदस्य एडवोकेट आकाश भगत एडवोकेट प्रज्वल मेश्राम

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करिता सतत सामाजिक कार्यात सक्रिय प्रीतम डोंगरे (मेजर) आणि संपूर्ण टीम आर्यन्स ग्रुप..नितेश डोंगरे.. सुरज आवचार मयूर अवचार अनिकेत शिरसाट गौतम खंदारे सुनील डोंगरे राजू जंजाळ,प्रेम तायडे..प्रमोद प्र डोंगरे नागेश डोंगरे पंकज डोंगरे सचिन डोंगरे रामलाल डोंगरे विशांत डोंगरे अनिकेत डोंगरे रोहित डोंगरे अमोल डोंगरे हिमालय डोंगरे आशिष डोंगरे…..इत्यादी युवकांनी पुढाकार घेऊन कारेक्रम यशस्वी करण्यात आला आर्यन्स ग्रुप वाडेगाव

Previous article_माझ्या विजयात मुख्याध्यापक संघाचा मोठा वाटा, _शिक्षक आमदार किशोर दराडे_
Next articleएक महिना पावसाळा संपला. तरी नदी, ओढयांना पाणीच नाही.