Home Breaking News _माझ्या विजयात मुख्याध्यापक संघाचा मोठा वाटा, _शिक्षक आमदार किशोर दराडे_

_माझ्या विजयात मुख्याध्यापक संघाचा मोठा वाटा, _शिक्षक आमदार किशोर दराडे_

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

आज नाशिक जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे आमदार किशोर दराडे यांचा सत्कार येवला येथे करण्यात आला . त्यावेळी सत्कारला उत्तर देताना आमदार किशोर दराडे म्हणाले की माझी या मतदारसंघात उमेदवारी करण्याची इच्छा नव्हती परंतु केवळ आणि केवळ मुख्याध्यापक संघाच्या सर्व* *पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यामुळे मी उमेदवारी करू शकलो आणि त्यांच्या आग्रहाने उमेदवारी केल्यामुळे त्यांनी परिश्रमपूर्वक काम करून माझा विजय निश्चित केला मी गेल्या सहा वर्षात जी शिक्षकांसाठी कामे केली ती कामे मुख्याध्यापक संघाच्या साक्षीने केलेली होती आणि त्यामुळे मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या उमेदवारीसाठी आग्रह धरला हे* *मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो तसेच गेल्या सहा वर्षात मी जुन्या पेन्शन योजनेसाठी त्याचबरोबर टप्पा अनुदानासाठी आश्रम शाळांची वेळ बदलण्यासाठी तसेच शिक्षकांचे प्रलंबित मेडिकल बिले ,रजा रोखीकरणाची बिले, फरकाची बिले ,पीएफ च्या रकमा यासाठी संपूर्ण विभागासाठी 1700 कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून* *आणले आणि गेल्या 2017 पासून प्रलंबित असलेल्या सर्व बिलांची पूर्तता केली त्यामुळे शिक्षक वर्ग माझ्यावरती पूर्णतः खुश होता ही सर्व काम करत असताना प्रत्येक वेळी मुख्याध्यापक संघ माझ्याबरोबर होता आत्तापर्यंत मी असं ऐकून होतो की टी .डी .एफ.च्या संघटनेने* *एखाद्या उमेदवाराला उमेदवारी दिली की तो उमेदवार निवडून येतो परंतु या वेळेला मी आवर्जून सांगू इच्छितो की मला मुख्याध्यापक संघाने उमेदवारी करण्यासाठी आग्रह केला आणि त्यामुळे मुख्याध्यापक संघाच्या आग्रहास्तव केलेल्या* *उमेदवारीमुळे मी निवडून आलो भविष्यात मी पुढील सहा वर्षांमध्ये सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांसाठी सभागृहामध्ये प्रश्न मांडत राहील* *आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करत राहील असे या प्रसंगी मी आश्वासित करू इच्छितो .*
*याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री एस के सावंत, सचिव – श्री .एस . बी . देशमुख, उपाध्यक्ष श्री प्रदीप सांगळे ,तसेच मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी डॉक्टर अनिल माळी, बी . के . नागरे, भागिनाथ घोटेकर ,आश्रम शाळा विभागाचे अध्यक्ष बी . एन . देवरे , येवला तालुका* *मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दीपक गायकवाड, माजी अध्यक्ष सी . बी . कुलदर ,कार्यवाह आरुण घोडेराव ,नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य के .डी देवडे, गोरख कुलदर, आप्पासाहेब जमदाडे, अजय विभुते ,बी . एफ .वाबळे, डी आर नारायने ,दिनकर दानी ,तसेच विविध तालुक्यांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.*

Previous articleपुणेआंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवात ‘ कवी मनोहर पवार ‘यांचे काव्यवाचन .
Next article*भंते शाक्यपुत्र राहुल यांच्या दाना मधून १०० गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप*