उदया दिसेल स्मारक मोठे । दबल्या मातीत वाडा शोधू कोठे ।
_________________पुणे ) पिंपरी चिंचवड पुणे येथे नुकतेच आंत रराष्ट्रीय काव्य महोत्सवाची सांगता झाली . त्यात केळवद जि. बुलढाणा येथिल कवी शाहीर मनोहर पवार यांनी ‘ भिडे वाडा . या विषयाची मांडणी करणारी काव्य रचना सादर केली.
कवी विजय वडवेराव पुणे यांनी ‘ भिडेवाडा ‘ देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव आयोजित केला होता . त्यामध्ये
महाराष्ट्र ‘गोवा ‘ गुजरात ‘ कर्नाटक ‘ केरळ ‘ आदी ठिकाणांचे मान्यवर कवी यांनी सहभाग नोंदविला . माय सावित्री तुला वंदन विजयाचे । तूच तर केले चंदन विजयाचे । आयोजक मा. विजय वडवेराव सर यांनी भिडेवाडा ,स्मारक होत असल्यानेच त्या निमित्ताने शिक्षणाच्या आद्य सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा उजाळा ‘ करण्या साठी . लोक चळवळ उभी केली . पिंपरी चिंचवड पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘ कवी ‘ शाहीर
मनोहर पवार यांनी – भिडे वाडयाची वेदना विषद केली आहे . पहा – – भिडेवाडा उभा अनेक काळात । प्रेरणा घेती लाखो बहुजनात ।
झाली मूक वाणी ।
तर पुढे ते आपल्या काव्यात मांडतात – होता वाडा साक्षी संघर्षाचा ।
गेला मातीत अंत
झंझावाताचा ।
कोण सांगेल कहाणी ॥
सावित्रीचा संघर्ष आणि वास्तव मांडतात – बहुजन निरक्षर । घेतला साऊने पुढाकार ।
बहूजना थोर साक्षर ।
कर्मठांना सांगे साऊ
ठणकावूनी । अशाच प्रकारचे भाष्य त्यांनी आपल्या काव्यात मांडून वास्तव समोर आणले तसेच ‘ त्यांना साथ देणारे –
फातीमा बी होती
साऊ सोबत ।
रचला इतिहास
भिडेवाड्यात । सांगे मनोहर शाहीर कवणा तूनी । तसेच उदया दिसेल इथे स्मारक मोठे ।
दबल्या मातीत स्मृती
पाहू वाडा कोठे । शेवटी वाड्याचा ‘ शेवट वेदना ‘ स्मृती गतकाळ ‘ कवी मनोहर पवार केळवदकर यानी या काव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे .