Home Breaking News ओ.बी.सी चे नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत हिमायतनगरातील ओ.बी.सी....

ओ.बी.सी चे नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत हिमायतनगरातील ओ.बी.सी. बांधवांचे तहसीलदारांना दिले निवेदन…

निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेवणार….. श्याम ढगे ( समता परिषद महाराष्ट्र)

हिमायतनगर /-अंगद सुरोशे दि.२१: अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ओबीसी बचाव आरक्षणासाठी प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी ७ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याला हिमायतनगर तालुक्यातील सर्व ओबीसी समाज, बारा बलुतेदार, अलुतेदार, भटक्या विमुक्त जाती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदने जाहीर पाठिंबा देऊन आज २१ जून रोजी हिमायतनगर तहसीलदार यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील ओबीसी बांधवांकडून आज दिनांक 21 जून रोजी हिमायतनगर तहसीलदारा मार्फत देण्यात आलेल्या निवेदनामध्ये ओबीसी समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात शिष्ट मंडळासह उपोषण स्थळी जावून उपोषणकर्त्यांची भेट घेण्याची व त्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात लेखी आश्वासन देण्याची विनंती या निवेदनात करण्यात आले आहे व तसेच ओबीसी आरक्षाला धक्का लागल्यास ओबीसी बांधव मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरतील व महाराष्ट्र शासनाने या निवेदनाची दखल न घेतल्यास दिनांक 26 जून रोज बुधवारी हिमायतनगर शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात येईल असा गंभीर इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे तसेच हिमायतनगर शहरा सह राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र सरकारची असेल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहेत…यावेळी ओबीसी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाबाराव जर्गेवाड ,दिलीप अला राठोड ,आनंदा मुतनेपवाड, रामेश्वर पाकलवाड, श्याम ढगे , नागेश शिंदे,सुनील चव्हाण, आनंद गायकवाड, सुभाष माने, ,विनोद आरेपल्लू, संतोष सातव, गजानन गोपेवाड, अशोक अनगुलवार, विजय वाठोरे, दिगाबर काळे, सुरज चीतलवार, दिलीप नागडे, ज्ञानेश्वर राहुलवार, सुभाष शिंल्लेवाड, सह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

शासन व प्रशासनाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यास दिनांक 26 जून रोज बुधवारी हिमायतनगर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येईल असा इशारा ओ बी.सी. संघटनेचे तालुका अध्यक्ष बाबाराव जर्गेवाड, दिलीप राठोड सह सकल ओबीसी समाज बांधवांनी हिमायतनगर तहसीलदार यांना यावेळी दिला आहे.

Previous articleनवीन शैक्षणिक सत्र सुरु होऊन अद्याप एकही शिक्षक आला नसल्याने कोठा तांडा येथील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळेला लावले कुलूप…!
Next articleवाडेगांव येथे नवीन प्रसूती गृह बांधकामाचे भूमिपूजन..