Home Breaking News जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक सवना शाळेतर्फे पहिल्याच दिवशी केले चिमुकल्यांचे स्वागत.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक सवना शाळेतर्फे पहिल्याच दिवशी केले चिमुकल्यांचे स्वागत.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 जुन 2024

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक/माध्यमिक शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आज पंधरा जुन रोजी पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त संख्या कशी वाढविता येईल. यासाठी सर्वच जिल्हा परिषद शाळेचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत.
विद्यार्थ्यांना अभ्यासाची रुची निर्माण होऊन खाजगी शिकवणीपैक्षा जिल्हा परिषदेच्या शाळा सध्यातरी सरस ठरत आहेत.
त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना ज. च्या शाळेमध्ये आज पहिल्यांच दिवशी वर्ग पहिलीतील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे. यावेळी मुख्याध्यापिका बोडावार मॅडम, मुधोळकर सर, बोबडे सर, नाईकवाडे सर, सतिश गोपतवाड आदी शिक्षकांची व पालकांची यावेळी उपस्थिती होती.

Previous articleलोकसभा निवडणुक २०२४ एक परामर्श
Next articleहिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे कार्यकर्त्यांकडुन स्वागत!