ॲड.पुजा प्रकाश एन.
१३ जुन २०२४
लोकशाही मध्ये लोकनियुक लोकप्रतिनिधिचं सरकार हा लोकशाही चा आत्मा असतो असा हा लोकशाही चा आत्मा २०२४ च्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचा टप्पा पार करूण संसदेमध्ये सरकारपंथी तत्वास दुर सारुण सरकार पदी नियुक्त झाला,स्वातंत्र्याची सत्याहत्तरी पार करत असतांना आझादी का अमृत महोत्सव ही आपण स्वाभिमानाने साजरा केला,पुंढील वर्षी आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करु ,संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपण प्रवेश करत असतांना १८ वी लोकसभा निवडणुक महत्वपूर्ण ठरते कारण कधी नव्हे ते या वर्षी झालेली लोकसभा निवडणुक संविधानाभोवती फिरली
संविधान वाचलं पाहिजे या एका तिन अक्षरी शब्दांच्या वाक्यावर १८ वि लोकसभा निवडणुक लढल्या गेली
निवडणुक प्रचार काळादरम्यान निवडणुकीत सहभागी झालेल्या समाजवादी, धर्मनिरपेक्ष, धर्मांध,पुरोगामी,प्रतीगामी,अशा विविध विचारधारा असलेल्या राजकीय पक्षांनी पक्षाच्या जाहिरनामा वर भाषणं करण्याऐवजी संविधान नष्ट होणार ते वाचलं पाहिजे यावर अधिक प्रमाणात बोलल्या गेलं,तर शालेय शिक्षणात मनुस्मृति च्या काही श्लोकांचा समावेश करावा अशा आशयाचं नोटीफिकेशन प्रगतिशील महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षा सचिव यानी काढलं व त्याचं काळात ज्यांच्या पासून संविधान बदललं जाइल अशी भिती पसरविली जात होती त्यांच्या मुखातुनचं प्रत्यक्षात आज बाबासाहेब आंबेडकर जरी आले तरी तेंही संविधान बदलु शकणार नाहीत अशी बलदांड आरोळी ठोकल्या गेली,अशा संविधान वातावरणात निवडणूक पार पडली
संविधान वाचलं पाहिजे हां मक्ता घेउन मैदानात उतरलेल्या व ज्याच्यापासुन संविधान बदलण्याची भिती होती अशा दोहों घटकांना संमिश्र यश मिळालं
निकाल आला व नुकतंच ज्यांच्यापासून संविधानास धोका होता त्यांचच सरकार शपथ ग्रहणासमयी संविधानाला शरण येउन संविधानातील तत्वानुसार सरकार चालवू अशी भिष्मप्रतीज्ञा घेउन स्थानापन्न झालं ,याकरीता लोकशाही अधिक प्रगल्भ करण्याकरीता निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्व जीत पराजित मान्यवरांच अभिनंदनचं
सरकार स्थानापन्न झालं,निवडणुक संपली, व खरी लढाई आता सुरु होईल संविधानानुसार सरकार चालतं कींवा नाही यावर बारकाइने अभ्यासपूर्ण दिवसरात्र लक्ष ठेवायला हवं , संविधान नियमावली प्रमाणे भारतातील प्रत्येक
घटकातील समाज समूहाच्या व्यक्तींचा व त्याच्या कुटुंब कल्याणकारीता काय उपाय योजना आखल्या जातात
संविधानाने रोजगार आरोग्य व मानवीय कल्याण हेतु केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या करीता दिलेल्या समाविष्ट मार्गदर्शक सुचना नियमावली नुसार प्रत्यक्षात अमंलबजावणी करणारी यंत्रणा विकसित केल्या जात आहे का हे पाहणं प्रत्येक व्यक्ति दृष्टया महत्वपूर्ण असलं पाहीजे,आणी हे होत नसेल तर संविधान वाचलं पाहिजे हे म्हणण्या आधी ते आपण वाचलं पाहिजे व ते वाचल्यानंतर त्या प्रमाणे सरकार ने कार्य केले पाहिजे या साठी नागरीकांनी रस्त्यावर नाक्यावर चौकाचौकात उपक्रम राबवले पाहीजे , संविधान वाचलं पाहिजे असा टाहो फोडुन संसदेत पोचलेल्यांनी संसद सभागृहात आवाज उठवला पाहीजे आणि येणारया काळात आपण यावर कार्य केले नाही तर संविधान वाचलं पाहिजे ही लढाई तुम्हीं भोंदू,ढोंगी होउन लढली हे सिद्ध होइल, तुम्हीं ढोंगी नाही आहात हे सिद्ध करण्यासाठी किमान तुम्हाला लढावं लागेल ,
तरचं भविष्यात निर्माण होउ पाहणारया पिढीकरीता भविष्यकालीन उदरात जन्म घेणारी नवसृजन पिढी करीता स्वयंप्रकाशीत स्वावलंबी भारत निर्माण होइल
भारत भूमिवर वास्तव्यास असणारया प्रत्येक घटकातील मानव समूहाच्या प्रत्येक व्यक्तींच्या सर्वांगीण उन्नति होउन
स्वयंप्रकाशीत स्वावलंबी भारत निर्माण करीता स्थानापन्न सरकार,विरोधी पक्ष व समस्त भारतीय नागरिकास मंगलमय सदिच्छा