जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 07 जुन 2024
भारत हा कृषिप्रधान देश असला तरी, या कृषिप्रधान देशात शेतक-यांचा यथोचित सन्मान कधी आणि केंव्हा करावा लागेल….. तेंव्हाच करावा लागतो..शेतक-यांना त्यांच्या पसंतीचे बियाणे दिल्यावर……
काही शेतकऱ्यांच्या पसंतीचे नामांकित कंपनीचे कपाशी बियाणे आजरोजी कृषिकेंद्रावर मिळेना…जर मिळाले तरी तेही…. जास्त दराने हिच शोकांतिका आहे शेतकऱ्यांची ……. शेतकरी हा बाजारातील शेकडो कंपनीचा माल जेंव्हा पेरून… जेंव्हा वर्षाकाठी उत्पादन घेतो…..तेंव्हाच तो त्या कंपनीच्या बियाण्याची मागणी करु शकतो…… हेही सत्य नाकारता येत नाही. तेंव्हा त्या बळीराजाचे एक वर्ष पूर्ण झालेले असते…
पण दुस-या वर्षी जेंव्हा तो गेल्यावर्षी वापरलेले बियाणे वापरतो.. तेंव्हा ते बियाणे बाजारात उपलब्ध नसेल, असेल….देव जाणे…
पण काही शेतकऱ्यांनी दबक्या आवाजात सांगितले आहे की, तीच बॅग…. तुम्हाला घेयायची झाल्यास जास्त पैसे द्यावे लागतात. ( नाकळत इशारा होतोय) ईथेच कुठेतरी पाणी मुरतंय….हा जावाई शोध घेण्यासाठी महाराष्ट्र शासन संबंधित विभागाने जनजागृती केली आहे का? हाही यक्षप्रश्न शेतकऱ्यांना आहेच ना…..
शेवटी शेतकरी भोळा भाबडा आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषि विभागाने तातडीने पावले उचलली पाहिजेत. हिच चर्चा जाणकार शेतकऱ्यां मध्ये आहे.