Home Breaking News फटाक्याच्या दुकाना बाजुलाच आग; अकोला येथील घटना

फटाक्याच्या दुकाना बाजुलाच आग; अकोला येथील घटना

मोठा अनर्थ टळला 

जिल्हा प्रतिनीधी योगेश घायवट

अकोला 6 जून 2024 : अकोल्यातील वाशिम बायपास रोड लगत बंदूकवाला यांचे फटाक्याचे दुकान असून दुकानाच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेमधील कचऱ्याच्या ठिगाऱ्याला अचानक आग लागल्याची घटना दुपारी 1 वाजे दरम्यान घडलीय.नागरिकांच्या हे लक्षात येताच महापालिका अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली, लगेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आगीवर पाण्याचा मारा करून आग विझवली,सुदैवाने बाजूलाच असलेल्या फटाक्याच्या दुकाना पर्यंत ही आग पोहोचली नाही तर मोठी दुर्घटना शहरात घडली असती.आगीत संपूर्ण कचरा जळून खाक झाला.अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग वेळीच विझविल्याने मोठा अनर्थ टळला.

Previous articleकुणा ला किती मतं मिळाली उमेदवार निहाय मतदान पहा सविस्तर 
Next articleअकोला बाळापूर मार्गावर टिप्पर च्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू