Home Breaking News कुणा ला किती मतं मिळाली उमेदवार निहाय मतदान पहा सविस्तर 

कुणा ला किती मतं मिळाली उमेदवार निहाय मतदान पहा सविस्तर 

योगेश घायवट
अकोला मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान झाले यामध्ये
एकूण 15 उमेदवार उभी होती,तर आज दिनांक 4 जून रोजी सकाळी 8 पासून मतमोजणी ला सुरवात झाली होती मतमोजणीच्या एकूण २८ फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला आहे,यामध्ये 15 उमेदवार निहाय मिळालेली मत अश्याप्रमाणे आहेत भारतीय जनता पार्टीचे अनूप धोत्रे यांना एकूण 4 लाख ५७ हजार ३० मतं मिळलीत,तर काँग्रेसचे अभय पाटील यांना ४ लाख १६ हजार ४०४ एकूण मतं मिळलीत, वंच‍ित बहुजन आघाडी चे प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७६ हजार ७४७ एकूण मत मिळलीत
बहुजन समाज पार्टीचे काशिनाथ धामोडे यांना २ हजार ७६० एकूण मतं मिळलीत, जय विदर्भ पार्टीचे रव‍िकांत रामकृष्ण अढाऊ यांना १ हजार ७३४ एकूण मत मिळलीत तर ॲङ नजीब शेख (इंडियन नॅशलन लिग) ३ हजार ३०० एकूण मते, प्रिती प्रमोद सदांशिव (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया) ५३६ एकूण मते, बबन सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी) ५३७ एकूण मते, मो. एजाज मो. ताहेर (आझाद अधिकार सेना) ५६८ एकूण मते, अशोक थोरात (अपक्ष) ५८१ एकूण मते, आचार्यद‍िप गणोजे (अपक्ष) १ हजार ६१८ एकूण मते, उज्वला राऊत (अपक्ष) १ हजार ३०६ एकूण मते, द‍िलीप म्हैसने (अपक्ष) ८६२ एकूण मते, धमेंद्र कोठारी (अपक्ष) १ हजार २४० एकूण मते, मुरलीधर पवार (अपक्ष) २ हजार ६६ एकूण मते,तर एकूण नोटा मतदान ५ हजार ७८३ होते.

Previous articleइंद्रवाड शिल्लेवाड विवाह सोहळ्यात उपस्थितांना मिळाली वृक्ष लागवडीची अनोखी भेट …..
Next articleफटाक्याच्या दुकाना बाजुलाच आग; अकोला येथील घटना