Home Breaking News इंद्रवाड शिल्लेवाड विवाह सोहळ्यात उपस्थितांना मिळाली वृक्ष लागवडीची अनोखी भेट …..

इंद्रवाड शिल्लेवाड विवाह सोहळ्यात उपस्थितांना मिळाली वृक्ष लागवडीची अनोखी भेट …..

लग्न समारंभात नविनच उपक्रम आलेल्या पाहुणे वराडी मंडळीला चक्क झाडे भेट …

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

आज सिरंजनी येथे श्री.नागनाथ भुमा शिल्लेवाड यांची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. शिवानी व श्री. नारायण इंद्रवाड बरबडेकर यांचे जेष्ठ चिरंजीव गुरूदास यांचा विवाह सोहळा सिरंजनी येथे मोठ्या थाटा – माटात पार पडला.

लग्न समारंभ उरकून पाहुणेमंडळी घराकडे परतत असतांना वराकडील मंडळीने सर्वांना एक एक रोपटे भेट दिले व सिरंजनी ग्रामपंचायत ला 50 रोपे भेट स्वरूपात दिली.
*झाडे लावूया झाडे जगवूया*
हा संदेश दिला वराचे बंधू अविनाश इंद्रवाड यांनी वृक्ष लागवड आज घडीला किती अत्यावश्यक गोष्ट आहे. हे लग्न मंडपात उपस्थित सर्व मंडळींना समजावून दिले.
अश्या प्रकारे एक स्तुत्य व आदर्श विवाह सोहळा या परिवाराने घेतला हा उपक्रम आज घडीला खूपच अनुकरणीय असा वाटला अशा प्रतिक्रिया उपस्थितकडून येत आहेत.

Previous article*ह्याला आयुष्य म्हणावं काय ?*
Next articleकुणा ला किती मतं मिळाली उमेदवार निहाय मतदान पहा सविस्तर