Home Breaking News हेमंत शिंदे- संपादक यांना जयमल्हार शैक्षणिक व बहुद्देशिय सामाजिक संस्था व यशवंत...

हेमंत शिंदे- संपादक यांना जयमल्हार शैक्षणिक व बहुद्देशिय सामाजिक संस्था व यशवंत सेना, अहिल्यानगर (अहमदनगर ) यांचा राज्यस्तरीय ” आदर्श पत्रकार ” पुरस्कार जाहीर

  1. अनिल उमाळे – मुख्य संपादक भूमी राजा न्यूज़ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 22 जून च्या 299 व्या जयंती सोहळ्यात पुरस्कार प्रदान होणार

हेमंत शिंदे नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़, ” भटक्या विमुक्तांचे अंतरंग ” विशेषांकाचे संपादक, पिवळ वादळ मासिकाचे सह संपादक व नाशिक स्टार न्यूज़ चे संपादक यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, व सांस्कृतिक क्षेत्रातील पत्रकारीतेतील विशेष कामगिरी बद्दलचा ” आदर्श पत्रकार पुरस्कार ” जाहीर झाला आहे.
शेक्षणिक क्षेत्रातील कामगिरी -:
1) महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2013 साला पासून शिक्षक भर्ती साठी घेण्यात येणाऱ्या टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा ही प्राथमिक शिक्षक पदाकरीता व टैट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही शिक्षक पदाकरीता घेण्यात येते. या परिक्षे करीता भटक्या विमुक्त जाती जमाती या प्रवर्गा वर अन्याय करत त्यांचा मागासवर्ग बदलून त्यांचा खुल्या प्रवर्गात समावेश करुन त्यांच्याकडून खुल्या प्रवर्गा प्रमाणे पुर्ण परीक्षा फी वसुल करुन अन्याय करत होते.
त्या विरुद्ध आवाज उठवून सर्व वर्तमानपत्रे, मासिक व न्यूज़ चैनल याद्वारे लिखाण करुन होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्या साठी बैठका व आंदोलने करुन समाजात जनजागृती करुन शासकीय स्तरावर जिल्हाधिकारी, पालकमंत्री, शिक्षणमंत्री, मागासवर्ग खात्याचे मंत्री, शिक्षणमंत्री, व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याशी सन 2017 पासून 2023 पर्यंत सातत्याने पत्र व्यवहार करीत त्यांचा शोध पत्रकारीतेच्या माध्यमातून होणारा अन्याय जनतेला व शासनाला निदर्शनास आणून दिला व अखेरीस 6 वर्षा नंतर महाराष्ट्र शासनाने तो अन्याय करणारा जी. आर. रद्द करुन पुन्हा भटक्या विमुक्त जाती जमातीना मागासवर्गात समावेश करुन त्यांना आर्थिक सवलत परत देण्याचा नवीन जी. आर. लागू केला.
2) नाशिक महानगर पालिकेने 2017 मधे शिक्षक पदा करीता भर्ती प्रक्रिया राबवून राज्यस्थरीय वर्तमान पत्रा मध्ये व प्रत्यक्ष अर्ज अश्या पदधतीने खुल्या प्रवर्गा कडून 500 रूपये डी. डी. च्या स्वरुपात व मागासवर्गाकडून 300 रुपये या प्रमाणे अर्ज मागावून घेतले. पण कोणत्याही प्रकारे 6 वर्षा मध्ये भर्ती न करता व उमेदवारांना न कळवता परस्पर भर्ती रद्द केली.
या अन्याया विरुद्ध लोकशाही मार्गाने महापालिका आयुक्त यांच्या कडे दाद मागण्यात आली, पण न्याय मिळाला नाही. मग त्या विरुद्ध शोध पत्रकारीतेच्या माध्यमातून वर्तमानपत्रे, मासिक, व न्यूज़ चैनल द्वारे होणाऱ्या अन्याया विरुद्ध जनजागृती केली व हजारो उमेदवारांचे लाखो रूपयांचे आर्थिक शुल्क देण्यास महानगर पालिकेस भाग पाडले.
3) केंद्र शासनाच्या आरटीई म्हणजेच राईट टु एज्युकेशन या कायदयाने समाजातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्याथ्रीना नामांकित इंग्रजी माध्यमातील शाळेत 8 वी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. पण काही शाळा या 7 वी पर्यंतच मोफत शिक्षण देवून शेवटच्या वर्षाचे शुल्क अन्यायी पदधतीने व कायदयाच्या विरुद्ध जावून पालकांकडून वसूल करीत होते. त्या विरुद्ध शिक्षण विभागा कडे पाठपुरावा करुन त्या गरीब पालकांना त्यांचा हक्क मिळवून दिला.

सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी

1) महासती अहिल्यादेवी होळकर या नाटकाचे व मी अहिल्या बोलतेय या एकपात्री प्रयोगाचे लेखन व दिग्दर्शन
2) अहिल्या देवीच्या स्फूर्तिदायक सामाजिक, धार्मिक, व सांस्कृतिक कार्याचे दर्शन नागरीकांना व विद्धयाथी यांना घडावे म्हणुन वरील नाट्य प्रयोगाचे अनेक कार्यक्रमातून व शेक्षणिक संस्था मधून सादरीकरण
3) राज्यस्तरीय पु. ल. देशपांडे महाकरंडक
एकांकिका स्पर्धाचे ” समन्वय क ” म्हणून आयोजक
4) महाराष्ट्रातील उपेक्षित कलावंतांना सांस्कृतिक व्यास पीठ उपलब्ध करुन देण्यासाठी घेण्यात आलेल्या समिक्षा बैठकीत राज्य प्रचारक पदी नेमणुक होवून त्या साठीचे कार्य
5)गोदा काठे वरील पुलाला ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळ कर पुल ” असा 15 x 4 फुटा चा भव्य बोर्ड लावण्या करीता नाशिक महानगर पालिककडे केलेल्या अथक प्रयत्नाला यश येवुन तो भव्य बोर्ड लावण्यात यश
6) राष्ट्र पुरुषाच्या जयंती व पुण्यतिथीच्या आयोजनात प्रमुख सहभाग

त्यांच्या या विशेष कार्याकरीता त्यांना या आधी रोटरी इंटरनेशनल ऑर्गनायझेशनच्या नाशिक स्मार्ट सिटीचा ” व्होकेशनल सर्विस अवार्ड, मुंबई महानगर महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघाचा ” अहिल्यादेवी पुरस्कार त्याच बरोबर नाशिक जिल्हा वर्त मानपत्रे लेखक संघाचा राज्यस्तरीय गोदारत्न पुरस्कार सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Previous articleग्रामीण भागात देशी दारुचा महापुर! 👉 अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.
Next articleअज्ञात वाहणाच्या धडकेत युवक ठार