Home Breaking News ग्रामीण भागात देशी दारुचा महापुर! 👉 अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.

ग्रामीण भागात देशी दारुचा महापुर! 👉 अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 में 2024

हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात अवेदय रित्या विना परवाना देशी दारु विक्री करत आहेत. पोलीसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होत आहे.
दिवसभर शेतात काबाडकष्ट करून, मजुरी करुन पैसा संसारासाठी जमा करायचा आणि संध्याकाळी थेट विना परवाना देशीदारु विक्रेत्यांकडे जाऊन दारु पिऊन आपल्या पत्नीला, मुलाबाळांना मारायचे हे वास्तव चित्र सध्या सवना गावासहित अनेक गावात आहे. याकडे हिमायतनगर पोलीसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार घडत आहेत. असा आरोप सवना गावातील नागरीकांनी दिला आहे. सवना, कार्ला पि, आंदेगांव आदि गावातील महिलांनी पोलीस स्टेशनला आपला मोर्चा वळवुन अर्ज दिला. परंतु त्याचा काहीही उपयोग नाही नाही. या देशीदारु मुळे पंधरा ते वीस वयवर्षे असलेली मुले नाहक बळी पडत आहेत. या विना परवाना देशी दारु विक्रेत्यांना वेळीच आवर घातला नाही तर पुढील काही वर्षांत गावचे चित्र वेगळे दिसेल. यांत शंका नाहीं.
पोलीस स्टेशनचे बिट जमादार यांनी दोन दिवसांत दारु बंद करावी. अन्यथा गावातील सर्वच नागरीक मुलाबाळासह हिमायतनगर पोलिस स्टेशनला मोर्चा वळविणार आहेत. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Previous articleरामकुंड पंचवटी येथे 31मे होणार भव्य दिव्य अहिल्या जन्मोत्सव…नियोजन बैठक
Next articleहेमंत शिंदे- संपादक यांना जयमल्हार शैक्षणिक व बहुद्देशिय सामाजिक संस्था व यशवंत सेना, अहिल्यानगर (अहमदनगर ) यांचा राज्यस्तरीय ” आदर्श पत्रकार ” पुरस्कार जाहीर