Home Breaking News धानोरा उपकेंद्र टीम ची बोरगडी तांडा २ येथे डेंगू रोगाची साथ निर्मूलनाच्या...

धानोरा उपकेंद्र टीम ची बोरगडी तांडा २ येथे डेंगू रोगाची साथ निर्मूलनाच्या दृष्टीने तातडीने उपाय योजना … ..!

बोरगडी तांडा येथील डेंगु साथीच्या रोगाने मृत पावलेल्या बालकाची वृत्त पत्रांनी व प्रसार माध्यमांनी दखल घेताच आरोग्य विभागाचे तातडीने खेडोपाडी तांडे वस्तीत साथीचे रोग थांबवण्यासाठीचे नियोजन सुरु..

हिमायतनगर / प्रतिनीधी( अंगद सुरोशे)

तालुक्यातील मौजे बोरगडी तांडा २ येथे डेंगू सदृश्य आजाराने बालक दगावल्याची माहिती मिळताच आरोग्य विभाग अतिशय सक्रिय झाला असून धानोरा आरोग्य उपकेंद्र येथील टीम ने तातडीने पाऊले उचलत बोरगडी तांडा २ येथे सलग तीन दिवस विविध उपाययोजना राबवून डेंगू साथ निर्मूलणाच्या दृष्टीने तातडीने स्वच्छता योजना राबवली
पण हिच खबरदारी आगोदर घेतली असती तर एका निष्पाप बालकाचे प्राण वाचवण्यासाठी प्रशासनाचे योगदान म्हत्वाचे ठरले असते

याविषयी सविस्तर वृत्त असे कि, दिनांक १७ मे रोजी डेंगू सदृश्य आजाराने बालक दगावल्याची घटना घडली. त्या अनुषंगाने धानोरा उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रेम वाघमारे व त्यांची टीम यांनी तातडीने गावात जाऊन आबेटिंग, संशयित रुग्णाचे रक्त नमुने घेणे, गावातील लोकांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे याबाबत मार्गदर्शन, ग्रामपंचायत कार्यालयास धुरफवारणी करण्या संबंधित सूचना, व इतर डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश पोहरे व चिंचोरडी येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. टारपे यांनी सुद्धा प्रत्यक्ष भेट देऊन विचारपूस केली व मार्गदर्शन केले.

या प्रसंगी धानोरा उपकेंद्र येथील डॉ. प्रेम वाघमारे, आरोग्य सेविका श्रीमती दवणे, सिकल सेल सहाय्यक चव्हाण, आरोग्य सहाय्यक लवटे आरोग्य सेवक श्रीकांत राठोड, शेख सय्यद, आशा वर्कर क्षीरसागर यांनी उशिरापर्यंत गावात थांबून वरील उपाययोजना करून गावकऱ्यांना आश्वासित केले.

डेंगू सदृश्य आजाराने बोरगडी तांडा येथील एका नऊ महिन्याच्या बालकाचा मृत्यू…!

Previous articleद्वेषाने पछाडलेला स्वयंघोषित संपादक…!!
Next articleरामकुंड पंचवटी येथे 31मे होणार भव्य दिव्य अहिल्या जन्मोत्सव…नियोजन बैठक