Home Breaking News डेंगूच्या आजाराचा ताप आल्याने बोरगडी तांडा येथील एका नऊ महिन्याच्या बालकाचा मृत्यू……

डेंगूच्या आजाराचा ताप आल्याने बोरगडी तांडा येथील एका नऊ महिन्याच्या बालकाचा मृत्यू……

हिमायतनगर / प्रतिनिधी ( अंगद सुरोशे)

प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा अंतर्गत येणाऱ्या बोरगडी तांडा परिसरात डेंगू सदृश्य आजाराने एका नऊ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना १८ मे रोजी घडली.

हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात काही दिवसापासून डेंगू सदृश्य आजाराचे मोठ्या प्रमाणात डेंगु,मलेरीया सारख्या रोगाचे रुग्ण आढळत आहे. बदलत्या वातावरणामुळे ताप,सर्दी, टायफाईड, यासह डेंगू या आजाराचे लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोरगडी तांडा येथील नऊ महिन्याचा विनायक लखन राठोड या बालकास हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करताच तेथील डाॅक्टरांनी उपचार केले पण बालकाची तब्बेत खालावत असल्याने पुढिल उपचारासाठी नांदेड येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर उपचार करुनही त्याचा ताप कमी झाला नाही. आणि १८मे रोजी दुपारी २ वाजता डॉक्टरांनी बालकास डेंगू सदृश्य आजाराने मृत झाल्याचे घोषित केले. त्यांच्या निधनाने बोरगडी परिसरामध्ये शोककळा पसरली असुन . हळहळ व्यक्त होत आहे आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तालुक्यात तसेच तांडे वाड्यात आरोग्य सेवक नसल्याने रुग्णाना तात्काळ सेवा मिळत नसल्यामुळे आशा घटना घडत असल्याचे बोलल्या जात आहे .
आरोग्य विभागाने बोरगडी तांडा परिसरासह तालुक्यातील गावात डेंगूसदृश्य रुग्णांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Previous articleहिमायतनगर येथील महावितरण उपविभाग कार्यालयावर लाईट सुरू करण्याच्या मागणी साठी शेतकरी व मुक्या जनावरांना मोर्चा धडकला…
Next articleतहानलेल्या वन्य प्राण्यांची थेट गावाकडे धाव……