Home Breaking News कृषी विभागामार्फत खरीप पुर्व हंगाम सभा संपन्न .

कृषी विभागामार्फत खरीप पुर्व हंगाम सभा संपन्न .

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 08 में 2024

हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी येथे कृषी विभागा अंतर्गत आपल्या शेतावर हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कृषि विभागाच्या निरनिराळ्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, रोजगार हमी योजना, शेततळे,कांदाचाळ,पॅक हाऊस, ठिबक तुषार सिंचन तसेच विविध योजनेअंतर्गत पीक प्रात्यक्षिक घेण्यासाठी अनुसूचित जाती व जमाती लाभार्थी निवड करण्यात आले. तसेच कृषी सहायक माने यांनी उपस्थित शेतकरी बंधू यांना मार्गदर्शन करतांना बांधावर वृक्ष लागवड योजना तसेच शेततळे योजना व संरक्षित सिंचन याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच खरीप हंगाम पुर्व तयारीच उद्देशाने माती नमुना घेण्याची पद्धत, बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक चा माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. खरीप पिकांचे नियोजन खत व्यवस्थापन कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी गावातील शेतकरी महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी भिजवलेल्या पोत्यात सोयाबीन बियाण्याचे शंभर दाणे घेऊन रात्रभर तसेच ठेवावे. दुस-या दिवशी किती दाणे उगवतात. यावर सोयाबीन घरचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.
शेतकऱ्यांने खरीप हंगामात बि-बियाणे, खते खरेदी करतांना दुकानदाराकडुन पक्की खरेदी पावती घ्यावी. बोगस बियाण्याची विक्री होत असल्यास तात्काळ तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे रीतसर तक्रार द्यावी. असेही माने साहेब यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करतांना मनोगत व्यक्त केले.

Previous articleशाहीर मनोहर पवार यांना ‘ लोककवी ‘ पुरस्कार जाहीर .
Next articleलग्नसराई संपली… शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त!