Home Breaking News वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती!

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 03 एप्रिल 2024

यावर्षी उन्हाळ्यात प्रचंड तापमानात वाढ होत आहे. सर्वत्र पाण्याचे स्त्रोत आटत आले आहेत. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. वानरांचा कळपच माणसांना न भिता पाण्याच्या टाकीवर अतिशय धिटपणाने पाणी पितांना दिसत आहे. 42° तापमानात वाढ झाली आहे. चिमणी, कावळे, बगळे यांसारखे पक्षी पाण्याच्या शोधात भटकत आहेत.
म्हणतात ना….” जल हि जिवण है”
सध्या लग्नसराई सुरू आहे. पाहुणे मंडळी थंडगार पाण्याची मागणी करतांना दिसत आहेत. जेवण कमी पण पाणी पिऊनच पोट भरत आहे. अशी चर्चा लग्नात पाहुणे करत आहेत. पशुपक्षी, वन्यप्राणी यांना पाण्याची व्यवस्था प्रत्येक नागरीकांचे करावी अशी मागणी होत आहे.

Previous articleहिंदी माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
Next article_इ ५ वी व ८ वी चा वर्ग प्राथमिक विभागाला जोडण्याच्या आदेशाला स्थगिती साठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ आक्रमक