Home Breaking News हिंदी माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

हिंदी माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

— के व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दत्त चौक, सिडको,नाशिक येथे1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा*
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन विद्यालयात साजरा करत असताना ध्वजारोहण प्रसंगी संस्थेचे विश्वस्त तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री भास्कर (नाना )सोनवणे ,संस्थेचे संचालक श्री विष्णुपंत नागरे, श्री माणिकराव जायभावे ,दिलीपराव सोनवणे ,माजी प्राचार्य एस. के. चकोर सर, व चारही विभाग प्रमुख प्राचार्य श्री प्रदीप सांगळे सर, मुख्याध्यापक श्री विलास सांगळे सर ,मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा नागरे थोरे मॅडम, मुख्याध्यापिका श्रीमती यादव मॅडम ,पर्यवेक्षक श्री संजय ताडगे सर चारही विभागाचे शिक्षक ,शिक्षकेतर ,कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र दिनाचे हिंदी माध्यमिक विद्यालयाचे ध्वजारोहण संस्थेचे विश्वस्त श्री भास्कर (नाना )सोनवणे यांच्या हस्ते तर कनिष्ठ महाविद्यालयाचे ध्वजारोहण संस्थेचे संचालक विष्णूपंत नागरे यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्वजपूजन, विखे पाटील को ऑप बँकेचे संचालक माणिकराव जायभावे दिलीपराव सोनवणे मा प्राचार्य एस के चकोर यांच्या उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच यावेळी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा हिंदी विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रदीप सांगळे सर यांनी दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काळे एस. के. यांनी केले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून चारही विभागाच्या वतीने मतदान जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले . श्री कापडी सर यांनी मतदान जनजागृती बद्दल पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी मतदान करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करण्यात आले.

Previous articleशिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालाकडे महाराष्ट्र परिक्षा परिषद पुणे यांच्या सह शिक्षक गटशिक्षण अधिकारी बि. ओ. यांच दुर्लक्ष….
Next articleवन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती!