Home Breaking News माध्यमिक शाळाचे 5 वी ते 8 वी च्या वर्गाचे निकाल तपासणीची शिक्षण...

माध्यमिक शाळाचे 5 वी ते 8 वी च्या वर्गाचे निकाल तपासणीची शिक्षण विभागानें सक्ती करू नये.

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांना दिले निवेदन

हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो.  8983319070

माध्यमिक शाळांचे ५ वी ते ८ वी च्या वर्गांचे निकाल_ तपासणीची शिक्षण विभागाने सक्ती करू नये . नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांना दिले निवेदन शिक्षण विभागाने फतवा काढून सन 23 – २४ या शैक्षणिक वर्षाचा इ ५ वी ते ८ वी या वर्गांचा निकाल केन्द्र प्रमुखामार्फत तपासणी करून घेण्या बाबत काही तालुक्यात व महानगरात सक्ती होताना दिसत आहे . या पुर्वी याबाबत कधीही अशा प्रकारच्या निकाल तपासणी करण्याबाबत सुचना नव्हत्या . मुख्याध्यापक स्वतःच्या शाळेचा निकाल तपासणी साठी सक्षम असताना आपल्या यंत्रणेचा मुख्याध्यापकांवर विश्वास नाही का ?आमच्या मुख्याध्यापकांचे महत्व कमी करायचे का ? जिल्हयातील कोणतीही शाळा केन्द्र प्रमुखाकडून निकाल तपासुन घेणार नाही असे शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांना मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस के सावंत ,सचिव एस* बी देशमुख ,उपाध्यक्ष प्रदिप सांगळे यांनी ठणकावुन सांगितले . आम्ही योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊ असे शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांनी सांगितले त्वरित पत्र काढु असेही आश्वासन मुख्याध्यापक संघाला दिले . यावेळी अध्यक्ष एस के सावंत, सचिव एस बी देशमुख, उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, किशोर पालखेडकर , डॉ अनिल माळी , डी जे रणधिर , भगीरथ घोटेकर, डी यु आहिरे, दशरथ जारस , एजाज अहमद, आर एस देशमुख, एम डी काळे यांच्यासह पदाधिकारी हजर होते .

Previous articleविजय वाठोरे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्रभूषण जीवनगौरव पुरस्कार जाहीर ….
Next articleमतदान करण्यासाठी नवरदेव चक्क मतदान केंद्रावर पोहचला.