अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी
नांदेड – महात्मा कबीर समता परिषद तर्फे देण्यात येणारा व महाराष्ट्रातील प्रतिष्टेचा समजला जाणारा राज्यस्तरीय महाराष्ट्रभूषण व जीवनगौरव पुरस्कार पत्रकार विजय वाठोरे सरसमकर यांना जाहीर झाला आहे. त्यांना शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ, मानपात्र, सन्मानपत्र, मेडल व ताम्रपट महापुरुषांचे जीवन चरित्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सरसम (बु ) येथील विजय नारायण वाठोरे यांना सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे.सामाजिक प्रश्नांना परखडपणे मांडत न्यायासाठी अक्षरशः अमरण उपोषणाचे हत्यार उपसणारे युवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते प्रसिद्ध आहेत.पत्रकार विजय वाठोरे हे शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.दररोज त्यांचे ‘ ठसका ‘ हे वात्रटीका सदर दै वीर शिरोमणी,दै प्रबुद्ध परिवार व दै क्रांतिशस्त्र मध्ये प्रकाशित होत आहे.लेख, बातम्या यातून ते समाजाचे प्रतिनिधित्व करून न्याय मिळवून देण्याचे,समाजात जनजागृती करणे, वास्तविकता मांडणे,सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी पत्रकारितेतून केलेले आहे.ते युवा ग्रामीण पत्रकार संघ हिमायतनगर चे तालुकाअध्यक्ष आहेत. कमी कालावधीत त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपला शिक्का उमटवला आहे.महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील यांनी त्यांना रीतसर निवडपत्र देऊन या पुरस्काराची घोषणा केली आहे.
त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार गंगाधर वाघमारे, परमेश्वर गोपतवाड,गंगाधर गायकवाड, नागोराव शिंदे, दाऊ गाडगेवाड,नागेश शिंदे,धोंडोपंत बनसोडे,मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी,अल्ताफ शेख, विष्णू जाधव, राजरतन वाठोरे,डॉ. संदेश वाठोरे, सुमेध वाठोरे,चंद्रमणी वाठोरे,लंकेश वाठोरे,इंजि.अमोल राऊत यांच्यासह आदिजणांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.विजय वाठोरे यांना पुरस्कार जाहीर झाला ही सरसमनगरी साठी अभिमानाची बाब आहे.