Home Breaking News पावसाचा कहर.. निवडणूकची रणधुमाळी अन् लगीनघाई!

पावसाचा कहर.. निवडणूकची रणधुमाळी अन् लगीनघाई!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 एप्रिल 2024

उन्हाळ्यात पाऊस आणि पावसात वधु-वराचे लग्न त्यातच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी…..
यावर्षी अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकरी राजाच्या पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. हळद या नगदी पिक काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, उन्हाळी ज्वारी, तिळ हि पिके भरात असताना अवकाळी पावसाने धु..धु..धुतले आहे.
त्यातच यावर्षी लग्न सराई जोरात सुरू आहे. पावसाने वधुवरांची दमछाक होत आहे. लग्नात होणारा खर्च पाहता शेतीवर होणा-या उत्पानावर वधु पित्याची परेशानी होत आहे. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने वराच्या पित्याला वधु पित्याची मुलगी द्या म्हणुन मनधरणी करावी लागत आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपआपला प्रचार जोरात करत आहे. कार्यकर्ते आपला उमेदवार कसा चांगला आहे. हे मतदारांना पठवुन देत आहे. एकंदरीतच पावसाचा कहर… निवडणुकीची रणधुमाळी अन् लगीनघाई हा त्रिवेणी संगम आला असल्याने नागरीकांत जोरदार चर्चा सुरू आहे.

Previous articleदेवाभाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वात “ऑल इंडिया पॅंथर सेनेचा” वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश..
Next articleविजय वाठोरे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्रभूषण जीवनगौरव पुरस्कार जाहीर ….