Home Breaking News रोजगार हमी योजनेच्या नावावर शासनाकडुन शेतकर्यांची हेळसांड कामे पुर्ण होऊनही आनुदानाची रक्कम...

रोजगार हमी योजनेच्या नावावर शासनाकडुन शेतकर्यांची हेळसांड कामे पुर्ण होऊनही आनुदानाची रक्कम मिळेना….

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत केलेल्या विहिर खोदकाम, व बांधकामाचा मावेजा त्वरीत नाही दिल्यास तहसिल कार्यालय हिमायतनगर समोर उपोषण करणार…. अ. गफार अ. वाहेद ( शेतकरी कारला )

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी

हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकर्यांना विहीर खोदकाम ,व शरद पवार गोठा योजने अंतर्गत गुरांसाठी शेड ची मंजुरी शासनाकडुन देण्यात आली. शेतकर्यांनी विहीरीचे खोदकाम व बांधकाम तसेच शेड चे बांधकाम पुर्ण करुन देखील अध्याप शेतकर्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा करण्यात आला नसल्याने गोरगरिब शेतकरी यांनी सावकारी कर्ज काढून आपल्या विहीरीचे काम पुर्ण केले तरीही खोदकाम पुर्ण केलेल्या विहिरीची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी मात्र अस्मानी संकटात सापडला आहे. त्यातच विहीरीचे काम करणारे मजुर यांना कामाचे पैसे हप्त्याला वेळेवर द्यावे लागत असल्याने शेतकर्यांची चिंता आधीकच वाढली असल्याने शासनाच्या आशा बेजबाबदार आधिकारी तसेच नाकर्तेपणाचा मोठा फटका गोरगरीब शेतकर्यांना सहन करावा लागत असल्याने व आशा परिस्थितीत जर शेतकरी यांना आत्महत्या प्रवृतव्हावे लागल्यास व काही घटना घडल्यास याला संबधीत
अधिकारी गट विकास अधिकारी, कार्यकारी अधिकारी, व तसेच जिल्हा अधिकारी हे सर्वस्वी जबाबदार राहतील अशी प्रखर भुमीका कारला येथील शेतकरी यांनी घेतली व त्वरीत रक्कम जमा नाही केल्यास दि. 23/4/2024 पासुन अमरावती उपोषण करणार असल्याचे येथील शेतकरी अ. गफार अ. वाहेद, पुंजाराम यमजलवाड, सुभाष मोरे, आत्माराम मोरे, बळवंत मिराशे, राजेश्वर ढाणके , अ. रहेमान अ. वाहेद, व सर्व लाभार्थी शेतकरी यांनी मागणी केली आहे.

Previous articleमतदान जनजागृती कार्यशाळा
Next articleमहिलांना उमेद्वारी देण्यात सर्वचं पक्ष मागे ॲड पुजा प्रकाश एन