Home समाजकारण दरवर्षी प्रमाणे-रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद व स्वाधीन बहुउद्देशीय संस्था यांचा सयुंक्त अभिनव...

दरवर्षी प्रमाणे-रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद व स्वाधीन बहुउद्देशीय संस्था यांचा सयुंक्त अभिनव उपक्रम साजरा

बौद्ध विहार तिथे भारतीय संविधान देऊन भिम जयंती साजरी*

पातुर प्रतिनिधी/
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त पातूर तालुक्यातील खानापूर,आस्टूल,कोठारी,पास्टूल,खामखेड,आगीखेड,नांदखेड, पार्डी या गावातील बौद्ध विहारात भारतीय संविधान प्रत देऊन व बौद्ध वंदना पुस्तक देऊन पुस्तक रुपी जयंतीनिमित्त अभिवादन करून आगळावेगळा जयंती साजरा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला सदर उपक्रम हा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या व स्वाधीन बहुद्देशीय संस्था पार्डी यांच्या वतीने करण्यात आला

यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष आकाश हिवराळे,स्वाधीन बहुद्देशीय संस्थेचे सचिव निलेश हिवराळे,प्रेमानांद इंगळे,सुरेश हिवराळे,पवन तांबे,हरिष गुडधे,वैभव अवचार, रुपेश अवचार,करण सरकटे,निलेश तांबे,आदित्य अवचार,बिट्टू अवचार आदी सर्वांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.

Previous articleतुम्ही जन्मले नसते तर !
Next article🏵️आयुष्याचे यशस्वी गणित 🏵️