Home Breaking News विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 09 एप्रिल 2024

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे. त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हेतूने शिक्षकांने अतिशय तळमळीने चिमुकल्यांना घडविण्याचे काम करावे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना ज. मा. शिक्षणतज्ञ अक्कलवाड पाटील यांनी बोबडे सरांशी हितगुज करतांना म्हटले आहे. आता सवना शाळेवर पुर्वीपेक्षा जास्त सहशिक्षक रुजु झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत असतांना कुठेही कुचराई करु नये, असेही ते म्हणाले.
मुलं म्हणजे चिखलांचा गोळा जसे जसा आकार देसाल तसेच घडणार….आपला मुलगा, मुलींनी शिकावं खूप मोठ व्हाव. हिच शेतात काबाडकष्ट करणाऱ्या आईवडिलांची ईच्छा असते. शाळेवरील शिक्षकांना अतिरीक्त शासकीय कामे लावुन, विद्यार्थ्यांचे नुकसान करणे हे शासनाने शक्य तो टाकावे. अशीही सुचनावजा विनंती पालकांनी केली आहे.

Previous articleमाणसं जपा… माणसे जपणे ही कलाचं. प्रत्येक जण हा कलाकारचं
Next articleतरूण व तडपदार देवराव भाऊराव हिवराळे यांची वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदि निवड.