Home Breaking News माणसं जपा… माणसे जपणे ही कलाचं. प्रत्येक जण हा कलाकारचं

माणसं जपा… माणसे जपणे ही कलाचं. प्रत्येक जण हा कलाकारचं

* ✍️ *मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड*✍️

प्रेमळ, आपुलकीचे संबध नक्कीच समृद्ध जीवनाकडे नेते. मन हलके होतेच शिवाय दुःखे ही वाटली जातात.

संबंध जेवढे घट्ट तेवढी आपुलकीत वाढ होते. त्यामुळे अडीअडचणी, आजार विसरतो. एकलकोंड्या प्रमाण कमी होते. आनंदी जीवन उपभोगनेसाठी माणसाना जपावे. मनावरील दडपण कमी होते.

शहरीकरणामुळे किंवा नोकरी व्यवसायामुळे लांब लाब राहणे आले. पण माणवाने त्यासाठी ही संपर्क यंञणा तयार केली.

पुर्वी फोन ही श्रीमंताची गरज होती. त्यानंतर महागडा मोबाईल आला. येणारे व जाणारे काॕलवरही खूपच खर्च होत होता. म्हणजेच श्रीमंतासाठीच…

आता तर लहानतल्या लहान, गरीबाकडे मोबाईल आले.किती ही बोला. खर्च कमी… त्यामुळे सर्वसामान्याना संपर्कासाठी मोठे माध्यम उपलब्ध झाले.

चांगले नातेसंबध निर्माण होऊ शकतात. जवळकी निर्माण होते. जिव्हाळा निर्माण होते. त्यासाठी मोबाईलचा उपयोग चांगला केला तर प्रेमाची मंडळी वाढेल.

अनावश्यक संदेश न पाठवता माणसं जपने कसे होतील असा संदेश /संभाषण होणे आवश्यक . पुर्वी अशा सोयी नव्हत्या.

पञानेच खुशाली विचारणे होते ५/१०/१५ पैशाचे पोष्ट कार्ड खूपच संपर्क साधून जात होते. दुःख /आनंद कळविली जात होती. नैसर्गिक वातावरण ही कळवले जात होती. मुलाबाळाविषयी / कुटुंबाविषयी पञाचार होत होता.

आता,विना विलंब,मनात आले तेव्हा माणसं जोडली जातात.फक्त अतिरेक होऊ नये एवढी काळजी दोन्हीही बाजूने घेणे आवश्यक अन्यथा ऐकमेकाना टाळणे ही होऊ शकते.

आदर, प्रेम जपावा. हेच वागले, तर सर्वत्र नक्कीच आनंदी वातावरण होईल. सुखी राहा. आनंदी राहा. माणसं जपा. गोडवा वाढवा…

Previous article
Next articleविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे.