Home Breaking News

गोदामाई प्रतिष्ठाण नाशिक चा ” गोदा स्वच्छता अभियाना ” चा 100 वा आठवडा शतक मोहत्सव मोठ्या उत्साहात साजरा

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

🌱 *गोदामाई प्रतिष्ठान नाशिक* 💧
संस्थापक/अध्यक्ष – आदिनाथ ढाकणे
उपाध्यक्ष/ मार्गदर्शक – मराठी सिने अभिनेते चिन्मय दादा उदगीरकर
नाशिक कार्याध्यक्ष – कु. सृष्टी देव

गोदामाई स्वच्छ्ता अभियान तब्बल 100 वा आठवडा.. “शतकमहोत्सव”

👉 विशेष उपस्थिती – सिने अभिनेते चिन्मय दादा उदगीरकर, अभिनेते किरण भालेराव, राजेश जी पंडित, आदिनाथ ढाकणे, चंदू पाटील, डॉ. सौदागिर,

*गोदामाई प्रतिष्ठान नाशिक अंतर्गत गोदा स्वच्छ्ता अभियान तब्बल 100 वा आठवडा. म्हणजेच शतकमहोत्सव हा अत्यंत आनंदात,जल्लोषात, आणि भव्य साजरा करण्यात आला. या शतकमहोत्सव प्रसंगी आई गोदावरी ची महापूजा, महाआरती देखील सर्व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते आणि जवळ पास

👉150 गोदामाई सेवकांच्या साक्षीने करण्यात आली. त्याच बरोबर आई गोदावरी ची 100 व्या आठवड्या अंतर्गत गोदा स्वच्छ्ता अभियान देखील राबविण्यात आले. गोदामाई प्रतिष्ठान नाशिक कार्याध्यक्ष कु.सृष्टी देव आणि श्री. आबासाहेब देव यांच्या अंतर्गत गेले 99 आठवडे अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम नाशिक मध्ये राबविण्यात आले.. या वेळी देखील “सूसाई हेल्थ केअर सर्व्हिसेस” ह्या ल्युपिड diagnostic lab अंतर्गत आरोग्य शिबिर चे देखील आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम अंतर्गत गोदामाई पत्रावळी देखील दत्ता कोठावदे यांनी केली आणि Casio वादक दिव्यांशू सिनकर याने गोदा संवर्धन गीत सादर केले.. यामुळे शतकमहोत्सव आणखीच बहरला.

शतकमहोत्सव.. कार्यक्रम निमित्ताने प्रमुख मान्यवर चिन्मय दादा उदगीरकर, किरण भालेराव, आदिनाथ ढाकणे, राजेश जी पंडित आणि त्याच बरोबर कार्याध्यक्ष सृष्टी देव,, यांनी गोदा स्वच्छ्ता बाबत जनजागृती केली.. व त्याच बरोबर आई गोदावरी चे पवित्र, सौंदर्य, अबाधित राहील.. आणि जास्तीत जास्त नदी प्रदूषण कसे थांबवता येईल या वर भाष्य केले. आणि तसेच गोदामाई प्रतिष्ठान नाशिक च्या संपूर्ण टीम च्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सांगता गोदावरी नदी संवर्धनासाठी प्रतिज्ञा घेऊन आणि महाप्रसादाने करण्यात आली.

 

Previous articleसवना येथे सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन.
Next articleमाणसं जपा… माणसे जपणे ही कलाचं. प्रत्येक जण हा कलाकारचं