Home Breaking News सवना येथे सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन.

सवना येथे सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 07 एप्रिल 2024

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. येथे खर्चाची बचत व्हावी म्हणून, दिनांक 18 एप्रिल रोजी सात जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. प्रचंड महागाई वाढल्यामुळे खर्च पेलवत नाही. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मेळाव्याचे आयोजन सर्व गावकरी बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे. हनुमान मंदिराच्या खारीमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यामुळे सामाजिक एकोपा निर्माण होऊन, एकमेकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते. सर्वजन या निमित्ताने एकत्र येतात. आपल्या घराचे लग्न समजुन प्रत्येकजन हातात पडेल ते काम अतिशय निस्वार्थ भावनेने पार पाडतो. सवना हे गांव चळवळीचे गांव म्हणून संबध हिमायतनगर तालुक्यात नव्हे तर नांदेड जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या मेळाव्यात पाहुणे मंडळीनी उपस्थित राहुन वधुवरांना शुभ आशिर्वाद द्यावेत अशी विनंती गावकरी बांधवांनी केली आहे.

Previous articleयुती व्हायला पाहिजे होती…!!
Next article