अंगद सुरोशे हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-
हिमायतनगर शहरात उष्णतेची तीव्रता वाढल्याने काल दिवसभर उन्हात काम करून रात्री घरी परत आल्यावर जीव कासावीस करत असल्याचे कारण सांगत सकाळ सकाळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या परमेश्वर सूरजवाड वय 32 या तरुण युवकाचा उष्माघाताने बी .पी.कमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची ही हिमायतनगर शहरातील ही पहिली घटना घडली त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
शहरातील नाभिक समाजाच्या तरुण युवकाचा आज दि 6 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजता काल जास्त उष्मघात झाल्यामुळे अचानक बि.पी.कमी होऊन आज सकाळी अचानक त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी आई, भाऊ असा मोठा परिवार आहे परमेश्वर सूरजवाड यांच्या जाण्याने सूरजवाड परिवारावर खूप मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे .