हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070
*_शिक्षकांच्या घामाचा पैसा_* *_चांदी मात्र अधिकारी आणि दलांलाची_* *_किती दुदैव त्या शिक्षकांचे २०१८ पासुन तर कोवीड कालावधी संपल्या नंतरही २०२४ पर्यंत मेडीकल बीले, फरकाची बीले , रजा रोखीकरण ही बीले मंजुर करून घेण्यासाठी_ मुख्याध्यापक संघ, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना, शिक्षक* *आमदार किशोर भाऊ दराडे पदविधर आमदार सत्यजीत तांबे यांनी पाठपुरावा करून वेळ प्रसंगी आंदोलन, मोर्चा ,उपोषण करून १६५ कोटीच्या बीलांना शिक्षण आयुक्त यांच्या कडून मंजुरी घेण्यासाठी ६ महिन्यांपासुन पाठपुरावा करणारे शिक्षक आमदार किशोर दराडे पदविधर आमदार सत्यजीत तांबे मुख्याध्यापक संघाचे राज्याचे* *सचिव एस बी देशमुख सर्व संघटनाचे पदाधिकारी यांना मेहनत घ्यावी लागली . पैसे २०२४ मध्ये जमाही झाले आणि नाटकं सुरू झाली . प्रत्येक भागात दलाल तयार केले टक्केवारी सुरु झाली जे स्वाभिमानी होते ते शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे व मुख्याध्यापक संघाकडे आले त्यांना अधिकाऱ्यांशी संवाद साधुन बीले मंजुर करण्यास चालना दिली आर्थिक व्यवहार कोणीही करू* *नये अशा स्पष्ट सुचना आमदार किशोर भाऊ दराडे यांनी दिल्या मात्र याला अंशत: अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली . म्हणुन मातोश्री इंजीनिअरींग कॉलेज ओढा (नाशिक ) येथे सर्व अन्यायग्रस्त व ६१६ शिक्षकांची अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे रखडलेली बीले तर २०० हुन अधिक शिक्षकांच्या बिलांना त्रुटी लागल्या या सर्व शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन अधिकारी यांची* *कान उघडनी केली शिक्षण उपसंचालक डॉ .बी . बी . चव्हान यांनीही शिक्षकांची बीले त्वरित काढण्याच्या सुचना दिल्या निधी परत जाता कामा नये असे स्पष्ट आदेश दिले . तरीही पे युनिट अधिक्षक नितीन पाटील यांच्या कार्यालया समोर शेकडो शिक्षक* *शिक्षकेत्तर कर्मचारी* *रात्री १० पर्यंत थांबुन होते . यातले गौडबंगाल मात्र समजलं नाही . दिवसा एक, रात्री दुसरचं अशी अवस्था शिक्षकांची निर्माण झाली याचा संपूर्ण आढावा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस .बी देशमुख प्रदिप सांगळे, संजय चव्हान , सोमनाथ धात्रक ,संजय देवरे, मोहन चकोर ,एम के वाघ ,प्राचार्य बाबासाहेब खरोटे ,एम डी काळे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला सर्व बीले मंजुर करून शिक्षकांच्या खाती त्वरित जमा करावी असे आदेश आमदार किशोरभाऊ दराडे यांनी दिले*