Home Breaking News बैलजोडीची किंमत लाखावर गेल्यावर शेतक-यांना ट्रॅक्टरने मशागत करावी लागते.

बैलजोडीची किंमत लाखावर गेल्यावर शेतक-यांना ट्रॅक्टरने मशागत करावी लागते.

👉 कृषी वार्तापत्र

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 29 मार्च 2024

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत कसतांना बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरने उन्हाळी हंगामातील शेतीची मशागत करीत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याला कारणही तसेच आहे. शेती करण्यासाठी बैलजोडी घेयायची झाल्यास एक बैलजोडी लाखांच्या वर किंमतीची घेणे शेतकऱ्यांना परवत नाही. असे जाणकार शेतकरी सांगत आहेत.
यावर्षी अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, शेतमालाला भाव नसणे, वाढती मजुरी, मजुरांचा अभाव, निविष्ठांचा वाढता खर्च या चक्रव्युहात शेतकरी अडकल्याने शेती करण्यासाठी कमालीचा संघर्ष करावा लागतो आहे.
त्यातच मुलींचे लग्न, शिक्षण, दवाखान्याचा खर्च, संसाराचा गाडा चालवत असताना वाढता खर्च याही बाबतीत बळीराचा परेशान आहे. लोकसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. पुन्हा त्याच आश्वासनाची खैरात करत भावी उमेदवार शेतकऱ्यांना पुर्वी चेच गाजर दाखविणार हे मात्र सत्य आहे. मी हे कामे केली. मी ते केली असे आपल्या कामाचा ससेमिरा मिरवित भोळ्या मतदारांना आकर्षित करतील अशी गावातील चौकाचौकात चर्चा आहे.
मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी कुणाकडे नेत्यांकडे वेळ मिळत नाही. हेही सत्य नाकारता येत नाही.

Previous articleजगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजमहोत्सव निमित्त जलंब येथे भव्य दिंडी सोहळा
Next articleशिक्षकांच्या घामाचा पैसा चांदी मात्र अधिकारी आणि द लांलाची