👉 विद्यमान आमदार ……. माजी आमदारचा करणार प्रचार.
@ *चर्चा राजकारणाची*@जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 27 मार्च 2024
देशभरात सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकाच दिवशी मतदान होणार आहे. अजुन तरी हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची आज घोषणा करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु दुसरीकडे मात्र भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदेगट) यांनी मात्र उमेदवारी बाबत आपले पत्ते उघड केले नाहीत.
👉 हिमायतनगर तालुक्यातील एकेकाळचे कट्टर विरोधक विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगांकर आणि नागेश पाटील आष्टीकर मात्र आजरोजी महाविकास आघाडी मध्ये येतात. हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगांकर यांना मात्र तत्कालीन विधानसभेचे विरोधक आणि सध्याचे महाविकास आघाडीचे लोकसभाचे विद्यमान उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचा प्रचार महाविकास आघाडी धर्म पाळत करावाच लागणार आहे. यामुळे तालुक्यात एकच चर्चा आहे. विद्यमान आमदार साहेबांना नागेश पाटील आष्टीकर यांचा प्रचार करावा लागणार आहे.