Home Breaking News हिमायतनगर शहरात दुचाकी चोरांची टोळी झाली सक्रिय

हिमायतनगर शहरात दुचाकी चोरांची टोळी झाली सक्रिय

एकाच दिवशी दोन दुचाकी चोरट्यांनी पळविल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत ….

अंगद सुरोशे
हिमायतनगर / प्रतिनिधी

हिमायतनगर – शहरातील जुन्या बॅंकेसमोरुन दि १८ मार्च रोजी दुपारी २:३० ते ३:१५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
याबद्दल हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय झाल्यामुळे संबंध हिमायतनगर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम येथील रहिवासी राजरतन वाठोरे हे हिमायतनगर येथे कामानिमित्त व येथे प्रमेश्वर यात्रा सुरू असलेल्या यात्रेला गेले असता येथील जुन्या स्टेट बॅंकेसमोर एम एच २६ ए एक्स ८७५० नंबरची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी २:३० वाजता लावून यात्रेत फिरायला गेले व परत ३:१५ वाजता गावाकडे जाण्यासाठी जुन्या बॅंकेसमोर येवून पाहिल्यावर सोडलेल्या जागेवर दुचाकी दिसत नसल्याने आजुबाजुला चौकशी केली परंतु दुचाकी सापडत नसल्यामुळे हिमायतनगर पोलीस स्टेशनला जाऊन दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर हिमायतनगर पोलीस स्टेशन येथुन कळाले की सदर ठिकाणी वरुन त्याच दिवशी रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास हिमायतनगर येथील रहिवासी शेख जमीर शेख महेबुब यांची ही एम एच २६ बी जे ४६१४ नंबर ची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस दुचाकी ही चोरट्यांनी चोरुन नेली.असे एकाच दिवशी हिमायतनगर शहरातुन अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाक्या चोरुन नेल्याची घटना घडली आहे.हिमायतनगर पोलीस ठाण्यात विजय नारायण वाठोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र दुचाकी चोरट्यांना पकडण्यासाठी येथील पोलिसांना यश मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असुन पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा शोध लावुन तालुक्यातील संपूर्ण चोरट्यावर आळा घालण्याची मागणी विजय वाठोरे यांच्यासह जनतेतून केली जात आहे.

हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिरासमोरून मुख्य चौकातूनच दोन्ही दुचाकी चोरी गेल्याने पोलीस प्रशासनाच्या हातावर तुरी देत चोरांनी दुचाकी चोरल्या आहेत.सामान्य नागरिकांसह आता पत्रकारांचीही दुचाकी चोरी गेल्याने नागरिकातुन आश्चर्य व्यक्त केल्या जातं आहे. पोलीस प्रशासन या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून त्या चोरट्याचा शोध लावण्यात यशस्वी होतील का? हे तपासाची चक्रे जलद गतीने फिरविल्याशिवाय कळणारच नाही.

हिमायतनगर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीसांच्या नाकावर टिच्चून अनेक प्रकारच्या अवैध धंदे दारू मटका जुगार गुटखा अश्या अनेक अवैध धंद्यानी जोर धरला असल्याचे चित्र शहरासह संपूर्ण तालुक्यात पाहायला मिळत आहे. परंतु नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक यांनी पदभार सांभाळल्या पासुन अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नसल्यामुळे हिमायतनगर तालुक्यात सध्या अवैध धंद्यासोबतचा चोरट्यांनीही जोर धरला आहे.

Previous articleभारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन बंद! 👉 ग्राहकांची हेळसांड
Next articleमराठा नेते मोदी, शहा व फडणवीस चे गुलाम का झाले हा लेख सर्व मराठा बहुजनांनी समजून घ्यावे, महाराष्ट्रातील मराठे ब्राह्मणाच्या पितृछायेत का गेली?