Home Breaking News भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन बंद! 👉 ग्राहकांची हेळसांड

भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन बंद! 👉 ग्राहकांची हेळसांड

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 24 मार्च 2024

हिमायतनगर येथे भारतीय स्टेट बँकेची एकच शाखा असुन, ग्राहकांना खात्यातील पैसे काढण्यासाठी सुलभ व्हावे. आणि होणारी गर्दी टाळता यावी. या उद्देशाने एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. परंतु ऐन होळीच्या दिवशी पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मात्र एटीएम मशीन बंद आहे. असे निदर्शनास आले. तेंव्हा एका ग्राहकांने हि मशीन नेहमीच बंद असते. असे रागाने बोलवुन दाखविले आहे. ऐन सणाच्या दिवशी एटीएम मशीन बंद राहणे, हे ग्राहकांची हेळसांड नाही का? असा खोचक प्रश्नही त्यांनी शाखाधिकारी यांना विचारला आहे. ग्राहकांच्या विश्वासाची शाखा म्हणजे भारतीय स्टेट बँक आहे. राहणार यात कुठलेही दुमत नाही. परंतु ग्राहकांची परेशानी लक्षात घेता ऐन सणाच्या दिवशी खात्यातील पैसे कुठून काढावे. हाही यक्षप्रश्न ग्राहकांना निश्चितच पडला आहे. सलग सुट्ट्या आल्याने खात्यातील पैसे काढण्यासाठी ईतर ग्राहक केंद्रावर आगावु पैसे देऊन काढावे लागतात. असे ग्राहकांने सांगितले आहे.

Previous article*शेतकऱ्यांसाठी होळीच्या सणाचे महत्त्व*
Next articleहिमायतनगर शहरात दुचाकी चोरांची टोळी झाली सक्रिय