Home Breaking News श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या यात्रेत महिलांच्या कुस्त्यांचा सामना रंगला….

श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या यात्रेत महिलांच्या कुस्त्यांचा सामना रंगला….

नामवंत कुस्ती पटूनी प्रेक्षकांची मने जिंकली…यात्रेत चांदीच्या गदाची कुस्ती ठरली विशेष आकर्षण….

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी:-नांदेड:-श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांनी येथील जंगी कुस्त्यांचा फड रंगवला यात सोलापूर, कोल्हापूर,नगर, बीड,लातूर,नांदेड सह हरियाणा राज्यातील जवळपास 500 पैलवानांनी स्पर्धेत सहभाग घेतला.त्यात महिला मुलीच्या कुस्त्या सुद्धा लावण्यात आल्या होत्या त्यात विजेत्या कुस्ती पैलवानांना मानाचा ध्वज व रोख पारितोषिक व चांदीची गदा देऊन मंदिर कमिटी कडून सन्मानित करण्यात आले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की तेलंगणा,विदर्भ व मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वर देवस्थान यात्रा महोत्सवाची सुरवात महाशिवरात्री पासून सुरू होती त्या यात्रा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दि 22 मार्च रोजी श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्री श्री मार्ग माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले सुरवातीला बाल गोपालांच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या त्यानंतर या कुस्ती स्पर्धेत संपर्ण महाराष्ट्रा सह इतर राज्यातील सुमारे 500 मल्लांनी सहभाग घेतला होता त्यात महिला कुस्त्यांचा फड पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली असल्याचे पहायला मिळाले

यावेळी येथील कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंतमल्लांच्या कुस्त्यांच्या खेळाचा आनंद या परिसरातील प्रेक्षकांनी लुटला ही स्पर्धा रात्री उशिरा पर्यंत सुरू होती या स्पर्धेत शेवटची मानाची कुस्ती बजरंग दल तर्फे ठेवण्यात आली होती ती कुस्ती कोल्हापूरच्या विक्रम गायकवाड या मल्लाने प्रथम क्रमांक पटकाला तर दुसरी कुस्ती भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल व शहर अध्यक्ष विपुल दंडेवाड यांच्या कडून दुसऱ्या कुस्तीचे विजेते निलेश पैलवान या मल्लास चांदीची गदा व 11 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन मान्यवराच्या हस्ते गौरवण्यात आले तर तृतीय मानाची समजली जाणारी कुस्ती स्व.परमेश्वर शिंदे यांच्या स्मरणार्थ पत्रकार नागेश शिंदे यांनी ठेवली होती त्या कुस्तीचा विजेता नांदेडचा राजू पैलवान यांनी 5 हजार रुपयांचे बक्षीस जिकल्या बद्दल त्यांचा मंदिर कमिटी कडून गौरवण्यात आले.यावेळी या कुस्ती स्पर्धेचे निरीक्षण भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल,शहर अध्यक्ष विपुल दंडेवाड,माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, तंटा मुक्ती अध्यक्ष अनवर खान पठाण,शिवसेना तालुका प्रमुख विठ्ठल ठाकरे,मंदिर कमिटीचे सदस्य अनंता मामा देवकत्ते, संजय माने, गजानन मुत्तलवाड , विलास वानखेडे, पत्रकार प्रकाश जैन ,अशोक अंनगुलवार,अनिल भोरे,परमेश्वर गोपतवाड,गोविंद शिंदे, दत्ता शिराणे,नागेश शिंदे, राम नरवाडे , सुभाष मामा शिंदे ,रामभाऊ सुर्यवंशी,प्रतीक ठाकरे,प्रवीण शिंदे,समाधान घुंगरे,निलेश पैलवान बोरगडी सह आदींनी केले ही कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्यातील शकडो कुस्ती रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड

Previous articleपळस फुलला
Next article*शेतकऱ्यांसाठी होळीच्या सणाचे महत्त्व*