Home Breaking News सहा जागा मागितल्याची बातमी खोटी!

सहा जागा मागितल्याची बातमी खोटी!

कार्यालयीन प्रतिनिधी:-वंचित बहुजनांच्या या राजकीय लोकलढ्याला बदनाम करण्याचं काम काही प्रस्थापित पक्ष करत असतात. त्यात आता काही माध्यमांनी उडी घेतल्याचा दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्या संदर्भात वार्तांकन करताना शहानिशा न करता खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. आज काही चॅनल्सने वंचित बहुजन आघाडीने सहा जागांचा प्रस्ताव दिल्याची खोटी बातमी चालवली. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही.

आम्हाला महाविकास आघाडीकडून अकोला आणि इतर दोन अशा एकूण तीन जागांचा प्रस्ताव आलेला होता, तो आम्ही नाकारलेला आहे. त्यानंतर या पद्धतीच्या पाच आणि सहा जागांचा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या ज्या चालत आहेत त्या बेसलेस आहेत. त्यात कुठलाही तथ्य नाही.

माध्यमांना आमची विनंती आहे, आम्हाला फोन करा, एकदा कन्फर्म करा आमच्याबद्दल बातमी देताना आणि मगच बातमी द्या. वंचित बहुजनांचं हे जे राजकीय आंदोलन पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत, त्यात कृपया अशा खोट्या बातम्या देऊन आडकाठी आणू नका.

: सिद्धार्थ मोकळे
मुख्य प्रवक्ता तथा प्रदेश उपाध्यक्ष,
वंचित बहुजन आघाडी

Previous articleगोदावरी अर्बन शाखेचा तामसा नगरीत कार्यारंभ
Next article_६१६ लोकांचे फरक बिल तातडीने शिक्षकांच्या खाती जमा करावे अन्यथा आंदोलन